जेव्हापासून भारताचा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांसाठी संघ जाहीर झाला आहे तेव्हापासून क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे सरफराज खान याला का घेतले नाही? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (13 जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित सामन्यांसाठी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला. त्यामध्ये एकाही संघात सरफराजचे नाव नव्हते. तो ज्याप्रकारे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सतत अप्रतिम कामगिरी करत आहे त्यावरून त्याला कसोटी संघात जागा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र चाहत्यांची निराशा झाली. त्यानेही सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत त्याची नाराजी व्यक्त केली आहे.
या 25 वर्षीय खेळाडूने संघनिवडकर्त्यांना डॉन ब्रॅडमन यांच्याशी संबधित पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत एकप्रकारे आठवण करून दिली. सरफराजने 2019-20 रणजी ट्रॉफीमध्ये सहा सामन्यात 154.44च्या सरासरीने धावा काढल्या. त्याने 3 शतके आणि 2 अर्धशतकांसह 928 धावा केल्या. हाच जबरदस्त फॉर्म त्याने 2021-22 हंगामात सुरू ठेवला. त्याने 122.75च्या सरासरीने 4 शतके आणि 2 अर्धशतकांसह 982 धावा केल्या. सुरू असलेल्या हंगामातही त्याने 431 धावा केल्या असून त्याची सरासरी 107.75 एवढी आहे.
प्रथम श्रेणीमध्ये चांगली कामगिरी करुनसुद्धा सरफराज पुन्हा एकदा भारताच्या कसोटी संघात जागा बनवण्यात अपयशी ठरला. त्याने शनिवारी इंस्टाग्रामवर दोन स्टोरी पोस्ट केल्या. त्यामध्ये त्याची आणि सर डॉन ब्रॅडमन यांची आकडेवारी दिसत आहे. यावरून त्याने निवडकर्त्यांना आरसाच दाखवला आहे, असा निष्कर्ष निघतो.
सरफराजला न घेतल्याने भारताचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा, इत्यांदीनी सोशल मीडियामार्फत नाराजी व्यक्त केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी सूर्यकुमार यादव याला 17 सदस्यीय संघात जागा मिळाली आहे. ‘सरफराजचे नाव अजूनही भारतीय संघात नाही. त्याला धोका दिल्यासारखे वाटत असेल. बुमराहही संघात नाही, हे वेगळे मात्र सरफराज नसल्याचे दुख झाले’, असे चोप्रा यांनी त्यांच्या यूट्युब चॅनलवर म्हटले.
प्रथम श्रेणीतील सरफराजची कामगिरी पाहिली तर त्याची सरासरी 80 आहे. त्याच्याव्यतिरिक्त केवळ ब्रॅडमन यांचीच सरासरी अधिक आहे. त्यांची सरासरी 95 पेक्षा अधिक आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारीमध्ये नागपूरमध्ये खेळला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
(Sarfaraz Khan Instagram Story Don Bradman goes viral because selectors ignored him for INDvAUS Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबचा वाघ ऑस्ट्रेलियात चमकला! विक्रम रचूनही कुणालाच लागला नाही पत्त्या, जाणून घ्याच
HWC 2023: स्पेननंतर भारतापुढे इंग्लंडचे कठीण आव्हान, कोचने संघाला केले सावध