मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश संघात सध्या बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रणजी ट्रॉफी २०२१-२२ चा अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने १२७.४ षटकात ३७४ धावा केल्या आहेत. मुंबईला ही मोठी धावसंख्या उभारून देण्यात सरफराज खान याचा मोठा वाटा राहिला. सरफराजने या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी केली आहे. या शतकी खेळीसह त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.
मध्य प्रदेशच्या (Mumbai Vs Madhya Pradesh) गोलंदाजांचा सामना करताना सरफराजने झुंजार शतकी खेळी (Sarfaraz Khan Century) केली. २४३ चेंडू खेळत त्याने १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १३४ धावा फटकावल्या. हे त्याचे चालू रणजी हंगामातील चौथे शतक होते. या शतकी खेळीसह त्याने आपल्या रणजी ट्रॉफीतील २००० धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याने आतापर्यंत रणजी क्रिकेटमध्ये २४ सामने खेळताना २३५१ धावा जोडल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजी सरासरी ८१.०६ इतकी राहिली (Best Average While Scoring 2000 Ranji Runs) आहे.
Innings Break!
Sarfaraz Khan's brilliant 134 & @ybj_19's solid 78 guided Mumbai to 374 in the first innings of the @Paytm #RanjiTrophy #Final.
Gourav Yadav scalped 4 wickets & was the top wicket-taker for Madhya Pradesh. #MPvMUM
Scorecard ▶️ https://t.co/xwAZ13U3pP pic.twitter.com/j2bkZJvFer
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 23, 2022
अशाप्रकारे रणजी ट्रॉफीत २००० धावा करताना सर्वोत्तम फलंदाजी सरासरी असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सरफराजने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसारख्या (VVS Laxman) फलंदाजांना मागे सोडले आहे. तो २००० रणजी धावा करताना सर्वाधिक फलंदाजी सरासरी असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूसी मोदी याच्यासह संयुक्तपुणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रूसी मोदी याची सरासरीही ८१.७ इतकीच आहे.
आता सरफराजच्या पुढे फक्त सचिन तेंडूलकर आणि विजय मर्चंट आहेत. सचिनने ३८ सामन्यात ८७.४ च्या सरासरीने ४२८१ धावा केल्या होत्या. तर विजय मर्चंट ९८.४ च्या सर्वोत्कृष्ट सरासरीसह ३२ सामन्यात ३६३९ धावा करू शकले होते.
Sarfaraz Khan 🤝 Love for scoring runs
He has been on a roll with the bat in #RanjiTrophy. 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/xwAZ13Csyh@Paytm | #Final | #MPvMUM | @MumbaiCricAssoc pic.twitter.com/3oZNKTNEYh
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 22, 2022
याखेरीज सरफराजने त्याच्या चालू हंगामातील ९०० धावाही पूर्ण केल्या आहेत. ६ सामने खेळताना त्याने ४ शतकांच्या मदतीने त्याने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी मागील हंगामात अर्थात २०१९-२० मध्येही त्याने ६ सामन्यात ३ शतकांच्या मदतीने ९२८ धावा केल्या होत्या. अशाप्रकारे तो २ रणजी हंगामात ९०० पेक्षा जास्त धावा करणारा तिसरा फलंदाज बनला आहे. त्याच्यापूर्वी अजय शर्मा आणि वसिम जाफर यांनी ही कमाल केली होती.
रणजी ट्रॉफीच्या दोन हंगामात ९०० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज-
१) अजय शर्मा – १०३३ धावा (१९९६-९७) आणि ९९३ धावा (१९९१-९२)
२) वसीम जाफर – १२६० धावा (२००८-०९) आणि १०३७ धावा (२०१८-१९)
३) सरफराज खान – ९२८ धावा (२०१९-२०) आणि ९३७*धावा (२०२१-२२)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ख्रिस गेल आणि विजय माल्याची ‘ग्रेटभेट’; लोकांनी युनिवर्स बॉसला केली ‘ही’ मागणी
तब्बल १०८ शतके ठोकणाऱ्या ‘आशियाई ब्रॅडमन’ची प्रकृती नाजूक, आयसीयूमध्ये आहेत भरती