मुंबई रणजी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सरफराज खानने जबरदस्त शतकी खेळी केली. रणजी ट्रॉफी २०२२ चा दुसरा उपांत्यपूर्व सामना मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात खेळला जात आहे. पहिल्या डावात मुंबईने ५०० धावांचा टप्पा ओलांडला. यामध्ये त्यांचा मध्यक्रमातील फलंदाज सरफराजने १५३ धावांचे योगदान दिले आणि चालू हंगामातील स्वतःच्या ६०० धावा पूर्ण केल्या. सरफराज चालू रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. एका खास यादीत त्याने दिग्गज डॉन ब्रॅडमननंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे.
हे शतक झळकावल्यानंतर आता सरफराज खानने (Sarfaraz Khan) एक मोठा खुलासा केला आहे. शतक झळकावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सरफराज म्हणाला की, ” मला शतक करायचे होते. मला ते सहजासहजी जाऊ द्यायचे नव्हते. मी रात्रभर झोपू शकलो नाही. रात्रभर माझ्या मनात शतक करण्याचा विचार होता.”
२४ वर्षीय सरफराजने रणजी चषकाच्या (Ranji Trophy) चालू हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि सध्या तो या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. या हंगामात सरफराजने केवळ पाच डावांत ७०४ धावा केल्या आहेत. या हंगामात त्याने तीन शतके झळकावली असून प्रत्येक डावात त्याने १५० हून अधिक धावा केल्या आहेत. या तिन्ही डावांमध्ये २७५ धावांच्या मोठ्या खेळीचाही समावेश होता.
दरम्यान, सरफराजने आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वतःच्या २००० धावा पूर्ण केल्या आहेत. या धावा त्याने ८० पेक्षा अधिकच्या सरासरीने केल्या आहेत. ही डॉन ब्रॅडमन (Don Bradman) नंतर दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी ९५.१४च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या. विजय मर्चंट यांनी ७१.६४, जॉर्ज हेडली यांनी ६९.८६ आणि बहिर शाह यांनी ५९.०२च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २००० धावा केल्या होत्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला विश्वास आहे!’ म्हणत पॉंटिंगने केली विराटची पाठराखण, स्वत:च्या कारकिर्दीचे दिले उदाहरण
क्रिकेटविश्वात कोणालाच न जमलेला विक्रम बाबर आजमने केलायं
‘अख्तरसोबत उमरानची तुलना अयोग्य’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या कर्णधाराचा सल्ला