पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या वतीने आयोजित व एमएसएलटीए, एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असेलल्या एमएसएलटीए-पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज 12 वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात सर्वज्ञ सरोदे, प्रज्ञेश शेळके, अधिराज दुधाणे, आरव पटेल, दक्ष पाटील यांनी तर, मुलींच्या गटात अवनी देसाई, तमन्ना नायर, स्वानिका रॉय, जान्हवी चौगुले या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स, शिव छत्रपती क्रिडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या सर्वज्ञ सरोदेने पंजाबच्या रणबीर संधूचा टायब्रेकमध्ये 7-6(10), 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या प्रद्न्येश शेळके याने तेलंगणाच्या रुद्रांश श्रीवास्तवचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. सातव्या मानांकित ऋषिकेश मानेने तेलंगणाच्या निकुंज खुराणाचा 6-0, 6-2 असा तर, तामिळनाडूच्या रॉनी विजय कुमार याने महाराष्ट्राच्या नमिश हूडचा 6-0, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मुलींच्या गटात अव्वल मानांकित कर्नाटकाच्या सृष्टी किरण हिने पश्चिम बंगालच्या शझफा एसकेचा 6-0, 6-0 असा तर, महाराष्ट्राच्या अवनी देसाईने आपलीच राज्य सहकारी अनुष्का शमुनीचा 6-1, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेचे उदघाट्न एमसीसीआयएचे महासंचालक प्रशांत गिरबाने, अमित परांजपे आणि अमित भार्गवा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक संचालक गौरव चतुर, ड्रीम रीडेव्हलपचे लक्ष्मी नारायण सेल्वराज आणि राहुल जहागीरदार, त्रिलिशच्या कविता नारायण, रँड पॉलीप्रॉडक्टचे सुविध नाडकर्णी, कमांडर विजय चतुर आणि आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री वैशाली कन्नमवार आली मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी:
मुले:
विवान मिर्धा(राजस्थान)[1]वि.वि.आरव छल्लानी(महा)6-3, 6-0
सर्वज्ञ सरोदे(महा) वि.वि.रणबीर संधू(पंजाब)7-6(10), 6-2
ऋषिकेश माने(महा)[7] वि.वि.निकुंज खुराणा(तेलंगणा) 6-0, 6-2;
प्रद्न्येश शेळके(महा)[4] वि.वि.रुद्रांश श्रीवास्तव(तेलंगणा) 6-0, 6-0;
रॉनी विजय कुमार (तामिळनाडू) वि.वि.नमिश हूड (महा) 6-0, 6-3;
अधिराज दुधाणे (महा)वि.वि.वीरेन चौधरी(महा) 6-1, 6-3;
ध्रुव सेहगल(महा)[8] वि.वि.आरव मुळे(महा) 6-3, 6-3;
स्मित उंद्रे(महा)[6]वि.वि.कियान पटेल(महा) 6-1, 6-3;
आरव पटेल(महा)वि.वि.कीर्तन विश्वास(कर्नाटक) 6-4, 6-3;
दक्ष पाटील(महा)[3]वि.वि.रोनक हरियानी (राजस्थान) 6-1, 6-0;
सुवर्णा शौनक(महा)[2]वि.वि.क्रिशय तावडे(महा) 6-1, 6-0;
मुली:
सृष्टी किरण(कर्नाटक)[1]वि.वि.शझफा एसके(पश्चिम बंगाल) 6-0, 6-0;
अवनी देसाई (महा)वि.वि.अनुष्का शमुनी(महा) 6-1, 6-1;
धृती गुंडू(तेलंगणा)वि.वि.रितू ग्यान(महा)7-5, 6-4;
तमन्ना नायर(महा)[8]वि.वि.अनिका नायर(महा)6-0, 6-0;
एशल पठाण (महा)वि.वि.अनुष्का जोगळेकर(महा) 6-1, 6-0;
वीरा हारपुडे (महा)वि.वि.बावनी हिरेमठ 6-1, 6-0;
स्वनिका रॉय (महा)वि.वि.काव्या तुपे(महा) 6-1, 7-5;
जान्हवी चौगुले(महा)वि.वि.सानवी राजू 6-1, 6-0.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फिफा अंडर17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया 2022 स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंमध्ये जागरूकता – बायचुंग भुतिया
INDvSA: रजत पाटीदारच्या वनडे एंट्रीवर दिनेश कार्तिकचे ट्वीट व्हायरल