जपान येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप (BWF World Championships) २०२२मध्ये भारताची स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांनी इतिहास रचला आहे. त्यांनी पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान देशाच्या युगा कोबायशी आणि ताकुरो होकी यांचा २४-२२, १५-२१, २१-१४ असा पराभव केला आहे. या विजयाबरोबरच त्यांनी उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. त्यांच्या या विजयामुळे भारताचे या स्पर्धेतील एक पदक निश्चित झाले आहे.
चिराग शेट्टी (Chirag Shetty) आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी (Satwik SaiRaj Rankireddy)यांनी त्यांच्या कामगिरीत सातत्य राखले आहे. नुकतेच या जोडीने बर्मिंघम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. आता या भारतीय जोडीकडून पुन्हा एकदा सुवर्णपदकाची आशा आहे.
भारताच्या पुरूष जोडीने पहिल्यांदाच या चॅम्पियनशीपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसेच हे भारताचे पुरूष दुहेरीचे हे पहिलेच पदक आहे. तर दुहेरीत (महिला-पुरूष) हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी २०११मध्ये भारताने महिला दुहेरीत कांस्य पदक जिंकले होते. हे पदक ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी जिंकून दिले होते.
💡𝗧𝗥𝗜𝗩𝗜𝗔💡@satwiksairaj/@Shettychirag04 are the first ever #BWFWorldChampionships men's doubles semifinalists from 🇮🇳. 👏
This assures India's second doubles medal after women's pair @Guttajwala/@P9Ashwini's bronze 🥉 in 2⃣0⃣1⃣1⃣.#Tokyo2022
📸 @badmintonphoto https://t.co/NI43vuWyXq pic.twitter.com/biUoBvSwBO
— BWF (@bwfmedia) August 26, 2022
चॅम्पियनशीपमध्ये भारताचे हे १३वे पदक
वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या इतिहासात भारताचे हे १३वे पदक असणार आहे. आतापर्यंत भारताच्या स्टार बॅडमिंटनपटूंनी या चॅम्पियनशीपमध्ये १२ पदके जिंकली आहेत. पहिले पदक प्रकाश पदुकोण यांनी जिंकून दिले होते. त्यांनी १९८३मध्ये डेन्मार्क येथे झालेल्या चॅम्पियनशीपमध्ये एकेरीत त्यांनी कांस्य पदक जिंकले होते.
भारताच्या नावावर या चॅम्पियनशीपमध्ये एकच सुवर्ण पदक आहे. हे पदक २०१९मध्ये पीव्ही सिंधू (PVSindhu) हीने जिंकून दिले होते. २०११नंतर भारतासाठी हा हंगाम सर्वात यशस्वी ठरला आहे.
चिराग-सात्विक यांचा उपांत्य फेरीत सामना मलेशियन जोडी ऍरोन चिया आणि सोह वुई यिक यांच्याशी शनिवारी (२७ ऑगस्ट) होणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय हा रिषभ! दुखापतग्रस्त आफ्रिदीची भारतीय खेळाडूंकडून विचारपूस, पंतने इथेही चेष्टा केलीच
पाकिस्तानला दुखापतींचे ग्रहण, आफ्रिदीनंतर ‘हा’ वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल
ENGvSA: दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस साहेबांचा; अँडरसन-ब्रॉड चमकले