पाकिस्तान संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. श्रीलंकन संघाविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात सौद शकील याने अर्धसतक केले आणि आपल्या नावापुढे मोठा विक्रम नोंदवसा. उभय संघांतील हा सामना कोलंबोमध्ये खेळला जात असून श्रीलंकन संघ स्वस्तात बाद झाला. प्रत्युत्तर पाकिस्तानच्या फलंदाजांनी मात्र धुवाधार खेळी करत संघाला दुसऱ्या सत्रापर्यंत 4 बाद 397 धावांपर्यंत नेले.
पोलंबो कसोटीत यजमान श्रीलंका संघ पहिल्या डावात अवघ्या 166 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेसाठी या सामन्यात धनंजया डी सिल्वा याने सर्वोत्तम 57 धावांची खेळी केली. पण पाकिस्तानसाठी मात्र सलामीवीर अब्दुल्ला शफीक (Abdullah Shafique) याने जबरदस्त सुरुवात केली. सौद शकील (Saud Shakeel) संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि अर्धशतक ठोकले. शकीलने 110 चेंडूत 57 धावांची खेळी केली. पाकिस्तानसाठी पहिला कसोटी सामना डिसेंबर 2022मध्ये खेळणाऱ्या शकीलसाठी हा कसोटी कारकिर्दीतील सातवा सामना होता.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (26 जुलै) सौद शकीलने अर्धशतक करताच आपले नाव इतिहासात कोरले. शकील कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याने कारकिर्दीतल खेळलेल्या सातही कसोटी सामन्यांमध्ये प्रत्येक वेळी किमान 50 धावांची खेळी केली आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीचा एकंदरीत विचार केला, तर आतापर्यंत त्याने सात सामन्यांतील 13 डावांमध्ये 875 धावा केल्या आहेत. 208 ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. यादरम्यान शकीलचा स्ट्राईकर रेट 46.03, तर सरासरी 87.50 राहिली आहे.
कसोटी क्रिकेटमधील सौद शकीलने केलेली 50+ धावसंख्या
76 – पहिला कसोटी सामना
63 आणि 94 – दुसरा कसोटी सामना
53 – तिसरा कसोटी सामना
55* – चौथा कसोटी सामना
125* – पाचवा कसोटी सामना
208* – सहावा कसोटी सामना
53* – सातवा कसोटी सामना
दरम्यान, शकीलने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात नाबाद 208 धावा कुटत संघाला विजय मिळवून दिला होता. विजयानंतर त्याला सामनावीर म्हणून निवडले गेले होते. (Saud Shakeel becomes the first player in Test history to score 50 each in the first 7 Tests.)
महत्वाच्या बातम्या –
जेमिमाने पुन्हा दाखवले सिंगिंगचे टॅलेंट! भारतीय क्रिकेटपटूचा व्हिडिओ तुफान व्हायरल
अनकॅप्ड भारतीय यष्टीक्षकाचं आयपीएलनंतर देवधर ट्रॉफीत वादळी शतक! सेंट्रल झोनची धावसंख्या 300 पार