फीफा जागतिक फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळाने बुधवारी (11 डिसेंबर) रोजी जाहीर केले की, सौदी अरेबिया 2034 पुरूष फुटबॉल विश्वचषक (Men’s Football World Cup) आयोजित करेल. तर 2030 विश्वचषक हंगाम स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को येथे आयोजित केला जाईल. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी हा निर्णय जाहीर केला.
जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) म्हणाले, “आम्ही फुटबॉल अधिक देशांमध्ये आणत आहोत आणि संघांच्या संख्येमुळे गुणवत्ता कमी होत नाही. त्यामुळे खरोखरच संधी वाढली.” फीफा आणि सौदी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, “2034च्या विश्वचषकाचे आयोजन केल्याने महिलांसाठी स्वातंत्र्य आणि अधिकारांचा विस्तार यासह महत्त्वपूर्ण बदल होऊ शकतात.”
याआधी, फीफाने 2027 महिला विश्वचषक ब्राझीलमध्ये (24 जून ते 25 जुलै) या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. दक्षिण अमेरिकेतील एखाद्या देशात ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केली जाणार आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी होणार आहेत. स्पेन हा या स्पर्धेचा सध्याचा चॅम्पियन आहे. त्याने 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या महिला विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
फीफा पुढील वर्षी स्पर्धेसाठी ब्राझीलची यजमान शहरे आणि स्टेडियमची घोषणा करण्याची शक्यता आहे. एकूण 12 स्टेडियम्सनी स्वारस्य व्यक्त केले आहे, ज्यामध्ये 2014 मध्ये पुरुषांच्या विश्वचषक सामन्यांचे आयोजन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघ कसा पोहोचणार, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये?
IND vs AUS; गाबा कसोटी खेळणार नाही जसप्रीत बुमराह? ऑस्ट्रेलिया खेळाडूचा मोठा दावा
पंजाबने लिलावात खरेदी केलेल्या खेळाडूची विस्फोटक खेळी, संघाला पोहोचवलं सेमीफायनलमध्ये