विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२(Vijay Hazare Trophy 2021-22): विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) सौराष्ट्रने (Saurashtra) विदर्भाला (Vidarbha) ७ विकेट्सने हरवत उपांत्यफेरीत प्रवेश केला. सौराष्ट्र संघाने भेदक गोलंदाजी करत विदर्भाला ४०.३ षटकांतच १५० धावांवर गारद केलं.
विदर्भाकडून अपूर्व वानखेडेने (Apoov Wankhede) ७२ धावा करत एकट्याने झुंज दिली. सौराष्ट्रचा कर्णधार जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) २ विकेट्स घेतल्या. सौराष्ट्रकडून प्रेरक मांकडने (Prerak Mankad) ७२ चेंडूत ७७ धावांची खेळी करून संघाला ३० षटकांत सहज विजय मिळवून दिला. सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात विदर्भाने पहिले फलंदाजी करताना ८ धावांवरच ३ विकेट्स गमावल्या होत्या.
उनाडकट आणि सकारिया (Chetan Sakariya) यांनी चांगली सुरुवात केली. उनाडकटने धडाडीच्या फॉर्ममध्ये असलेल्या अथर्व तायडेला (Atharva Taide) स्वस्तात तंबूत माघारी पाठवलं. गणेश सतीश (Ganesh Satish) (१) आणि यश राठोड (Yash Rathod) (१) सुद्धा लवकर तंबूत परतले.
कर्णधार फैज फझल (Faiz Fazal) आणि यष्टिरक्षक अक्षय वाडकर (Akshay Wadkar) यांनी चौथ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केली. प्रेरक मांकडने वाडकरला बाद करत भागीदारी मोडली. विदर्भाने ५ विकेट्स ६६ धावांवर गमावल्या होत्या. वानखेडने ६९ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ७२ धावा केल्या, पण तो एकटाच लढवय्या ठरला त्याला कोणीच साथ नाही दिली.
आदित्य सरवटे (१४), ललित यादव (१), यश ठाकूर (०) आणि आदित्य ठाकरे (०) यांच्या खराब प्रदर्शनामुळे विदर्भ संघ १५० धावांतच गारद झाला. सौराष्ट्रकडून लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज विश्वराज जडेजा (०) आणि हार्विक देसाई (९) लगेचच तंबूत माघारी परतले. दोन्ही विकेट्स आदित्य ठाकरेने घेतल्या. शेल्डन जॅक्सन (Sheldon Jackson) आणि मांकड तिसऱ्या विकेटसाठी २२ धावाच करू शकले.
मांकड आणि अर्पित वासवडा (४१*) यांनी चौथ्या विकेटसाठी ११६ धावा जोडत संघाला विजय मिळवून दिला. मांकडने त्याच्या खेळीत १० चौकार आणि २ षटकार मारले. तेच वासवडाने ६ चौकार ठोकले. उपांत्यफेरीत सौराष्ट्र आता बलाढ्य संघ तामिळनाडूला (Saurashtra vs Tamilnadu) भिडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-