सैराष्ट्रच्या 23 वर्षांखालील क्रिकेट संघातील खेळाडू अडचणीत आले आहेत. संघ चंदीगडमध्ये सामना खेळून मागार परतत होता. पण विमानतळावर संघातील खेळाडूंकडे मोठ्या प्रमाणात दारू सापडल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. सौराष्ट्रचा 23 वर्षांखालील संघ कर्नल सीके नायडू ट्रॉफीतील सामना खेळल्यानंतर चंदीगडहून राजकोटडे रवाना होणार होता. पण त्याआधीच हा प्रकार समोर आला आहे.
ही घटना 25 जानेवारी रोजी घडली असून सौराष्ट्रचा 23 वर्षांखालील संघ राजकोटच्या दिशेने रवाना होणार होता. संघ हवाई मार्गाने जाणार असून खेळाडू विमान तळावर दाखल झाले होते. पण कार्गो एरियामध्येच अधिकाऱ्यांनी सौराष्ट्रच्या खेळाडूंकडे दारू असल्याचे ओळखले. माध्यमांतील वृत्तांनुसार सौराष्ट्रच्या खेळाडूंनी आपल्या टीक बॅगमध्ये एकूण 27 दारूच्या बॉटल्स लपवल्या होत्या. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एससीएने या घटनेची पुष्टी केली आहे. माहितीनुसार संघातील पाच खेळाडू या प्रकरणात प्रमुख दोषी म्हणून समोर येत आहेत.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सांगितल्याप्रमाणे ही घटना सहन करण्यासारखी नक्कीच नाहीये. याच कारणास्तव बोर्डाने या प्रकरणात तपास सुरू केला आहे. तसेच खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई देखील होऊ शकते. एससीएच्या म्हटल्याप्रामाणे, “चंदीगडमध्ये ही घटना घडल्याचा आरोप आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएसनच्या लक्षात ही बाब आणून दिली गेली आहे. ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे आणि सहन करण्याजोगी नाहीये. एससीएची शिस्तपालन समिती याय घटनेची सखोल चौकशी करेल. त्यानंतर शिस्तभंगाची करवाई देखील होईल.”
दरम्यान, या घटनेआदी सौराष्ट्र क्रिकेट संघाने चांगले प्रदर्शन केरत यजमान संघाला मात दिली. सौराष्ट्रेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 58.4 षटकांमध्ये 285 धावा केल्या. पी राणा याने 128 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे चंदीगडसाठी अमित शुक्ला याने सहा विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात चंदीगड संघ फलंदाजीला आल्यानंतर त्यांचा पहिला डाव 117 धावांवर संपला. गज्जर समरने पाच विकेट्स घेतल्या आणि राणाने अष्टपैलू प्रदर्शन करत दोन विकेट्स घेतल्या. चंदीगडला फॉलो ऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी 233 धावा केल्या. शेवडच्या डावात फलंदाजीला आलेल्या सौराष्ट्र विजयासाठी अवघ्या 66 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 9 विकेट्स राखून गाठले.
(Saurashtra cricketers found 27 bottles of liquor at Chandigarh airport)
महत्वाच्या बातम्या –
राज्य बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश प्रथम । विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन
वर्षातील सर्वोत्तम बुद्धिबळ प्रशिक्षकांमध्ये पुण्याचे पाहिले ग्रँड मास्टर अभिजित कुंटे