---Advertisement---

SAvsIND, 2nd Test: सलामीवीरांनंतर पुजारा-रहाणेने सावरला डाव, दुसऱ्या दिवसाखेर भारताकडे ५८ धावांची आघाडी

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 9:10 PM
Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara
---Advertisement---

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सोमवारपासून (३ जानेवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. द वाँडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याचा मंगळवारी दुसरा दिवस होता. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेने १९ व्या षटकापासून आणि १ बाद ३५ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती आणि दिवसाखेर यजमान संघ सर्वबाद होत पाहुण्या भारताने २ बाद ८५ धावा केल्या आहेत. यासह भारताकडे ५८ धावांची आघाडी आहे. चेतेश्वर पुजारा ३५ धावा आणि अजिंक्य रहाणे ११ धावांवर नाबाद आहेत.

पुजारा आणि रहाणेपूर्वी भारताचा कर्णधार आणि सलामीवीर केएल राहुल स्वस्तात ८ धावांवर झेलबाद झाला. मार्को जेन्सनने ऍडम मार्करमच्या हातून त्याला झेलबाद केले. तसेच दुसरा सलामीवीर मयंक अगरवाल यालाही डुआन ऑलिवियरने २३ धावांवर पायचीत केले.

तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या डावात किगन पीटरसनने सर्वाधिक ६२ धावा केल्या होत्या. ९ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली होती. तसेच टेम्बा बावुमाने ५१ धावांचे योगदान दिले होते. यांच्याव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाज भारताच्या गोलंदाजांपुढे साजेशी खेळी करू शकले नाहीत. भारताकडून या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या होत्या.

अशी झाली दुसऱ्या दिवसाची सुरुवात

दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या दिवसाखेर नाबाद असेलेले कर्णधार डीन एल्गार आणि किगन पीटरसन यांनी दुसऱ्या दिवशी त्यांची भागीदारी पुढे कायम केली. या दोघांनीही सुरुवातीला सावध खेळ करताना दक्षिण आफ्रिकेला २७ षटकात ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. १ बाद ३५ असा सुरू झालेला डाव भारतीय गोलंदाजांनी लंच पर्यंत ४ बाद १०२ असा मर्यादित केला. पहिल्या दिवशीचे नाबाद फलंदाज डीन एल्गर व किगन पीटरसन यांनी सावध सुरुवात केली. मात्र, शार्दुल ठाकूर याने आधी एल्गर व त्यानंतर पीटरसनला बाद करत दक्षिण आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलले. पीटरसन याने अर्धशतक झळकावले. पहिल्या सत्राच्या अखेरीस डूसेन बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेची वाताहात झाली. भारतासाठी दुसऱ्या दिवशीचे पहिल्या सत्रातील सर्व बळी शार्दुल ठाकूरने मिळवले.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारतीय संघ मोठी आघाडी घेण्याच्या उद्देशाने मैदानात उतरला. मात्र, टेंबा बवुमा व कायले वेराना यांनी महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी रचली. दक्षिण आफ्रिका संघ आघाडी घेण्याच्या दिशेने जात असतानाच, शार्दुल ठाकूर पुन्हा भारतीय संघाच्या मदतीला धावला. त्याने आधी वेराना व नंतर बवुमाला बाद करत दक्षिण आफ्रिकेला सामन्यात मागे खेचले. त्यानंतर मोहम्मद शमी याने रबाडाला तंबूचा रस्ता दाखवला. अखेरचे वृत्त हाती येईपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या ७ बाद १८० धावा झालेल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेकडे महत्वपूर्ण आघाडी
दुसऱ्या दिवशीचे तिसरा सत्र सुरु होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघ ११ धावांनी मागे होता. तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराहने केशल महाराजला झटपट तंबूचा रस्ता दाखवला. मात्र, मार्को जेन्सन याने एक हाती किल्ला लढवला व संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर, शार्दुलने पुन्हा एकदा संघाला अडचणीतून बाहेर काढत जेन्सनला बाद केले. त्याने २१ धावा केल्या. शार्दुल अखेरचा बळी मिळवत आपले सात बळी पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचा संघ २२९ धावांवर बाद झाला. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या डावात २७ धावांची आघाडी मिळाली.

तत्पूर्वी पहिल्या दिवशी भारताचा संघ पहिल्या डावात २०२ धावांवर सर्वबाद झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---