आगामी एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धा 13 ते 23 जुलै यादरम्यान कोलंबो, श्रीलंका येथे पार पडणार आहे. आठ आशियाई संघात पार पडणारी ही स्पर्धा 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा नुकतीच झाली असून, कट्टर प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान हे 19 जुलै रोजी आमने-सामने येतील.
एसीसी पुरुष इमर्जिंग आशिया चषक 2023 स्पर्धेत दोन गट असून भारत अ संघ ‘ब’ गटात आहे. या गटात भारतासोबत नेपाई, यूएई अ आणि पाकिस्तान अ संघाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त श्रीलंका अ, बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ आणि ओमान अ हे संघ ‘अ’ गटात आहेत. या दोन्ही गटातील अव्वल संघ स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रवेश मिळवतील.
भारतीय संघ या स्पर्धेत आपल्या अभियानाची सुरुवात 14 जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध करेल. त्यानंतर भारताचा दुसरा सामना 17 जुलै रोजी नेपाळ विरुद्ध होणार आहे. तर अखेरचा साखळी सामना 19 जुलै रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला जाईल. भारत व पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरले तर पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये घमासान रंगेल. मागील वर्षी भारताला 19 वर्षाखालील मुलांचा विश्वचषक जिंकून देणारा दिल्लीचा यश धूल या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
भारत अ संघ-
साई सुदर्शन, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, यश धूल (कर्णधार), रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मानव सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितीशकुमार रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर
(Schedule For ACC Emerging Asia Cup 2023 India And Pakistan Play At 19 July)
महत्वाच्या बातम्या-
हार्दिक आणि विजयसोबतच्या तुलनेविषयी शिवम दुबेचे मोठे विधान; म्हणाला, ‘मी इतर खेळाडूंना…’
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’