भारतीय पुरुष क्रिकेट संघ नव्या वर्षाचे स्वागत घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध करणार आहे. यावर्षी भारत मागील चुका सुधारण्याचा प्रयत्नात असणार आहे. 2023मध्ये भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. कारण यावर्षी भारत वनडे विश्वचषकाचे आयोजन करत आहे. या स्पर्धेशिवाय भारत आशिया चषक खेळणार आहे. यामुळे भारत 2023मध्ये 8 कसोटी, 18 वनडे आणि 17 टी20 सामने खेळणार आहेत. या सामन्यांमध्ये आयसीसी स्पर्धांमुळे वाढ होण्याची शक्यता आहे.
भारत आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशीप 2021-23च्या अंतिम फेरीत पोहचला, तर आणखी एका कसोटी सामन्याची भर पडणार आहे. यामध्ये आपण भारत कोणाविरुद्ध किती आणि कोणते सामने खेळणार आहेत ते पाहू.
श्रीलंकेचा भारत दौरा, 2023
3 जानेवारी – पहिला टी20 सामना, मुंबई
5 जानेवारी – दुसरा टी20 सामना, पुणे
7 जानेवारी तिसरा टी20 सामना, राजकोट
10 जानेवारी – पहिला वनडे सामना, गुवाहाटी
12 जानेवारी – दुसरा वनडे सामना, कोलकाता
15 जानेवारी – तिसरा वनडे सामना, तिरुअंनतपुरम
न्यूझीलंडचा भारत दौरा, 2023
18 जानेवारी – पहिला वनडे सामना, हैद्राबाद
21 जानेवारी – दुसरा वनडे सामना, रायपूर
24 जानेवारी – तिसरा वनडे सामना, इंदौर
27 जानेवारी – पहिला टी20 सामना, रांची
29 जानेवारी – दुसरा टी20 सामना, लखनऊ
1 फेब्रुवारी – तिसरा टी20 सामना, अहमदाबाद
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, 2023
9 ते 13 फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना, नागपूर
17 ते 21 फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना, दिल्ली
1 ते 5 मार्च – तिसरा कसोटी सामना, धरमशाला
9 ते 13 मार्च – चौथा कसोटी सामना, अहमदाबाद
17 मार्च – पहिला वनडे सामना, मुंबई
19 मार्च – दुसरा वनडे सामना, विशाखापट्टणम
22 मार्च – तिसरा वनडे सामना, चेन्नई
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मार्च ते जून महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असल्याने भारताच्या संघाला ब्रेक असणार आहे.
आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23चा अंतिम सामना- हा सामना जूनमध्ये होणार आहे आणि भारत जर यासाठी पात्र ठरला तर भारताच्या वेळापत्रकात आणखी एक कसोटी सामना जोडला जाणार आहे.
Schedule of Indian team in 2023:
3 ODI, 3 T20 vs SL (H)
3 ODI, 3 T20 vs NZ (H)
4 Test, 3 ODI vs AUS (H)
WTC final
2 Test, 3 ODI, 3 T20 vs WI (A)
Asia Cup
3 ODI vs AUS (H)
ODI World Cup
3 T20 vs AUS (H)
2 Test vs SA (A)— Johns. (@CricCrazyJohns) January 1, 2023
भारताचा वेस्टइंडिज दौरा, जुलै-ऑगस्ट 2023
या दौऱ्यात दोन कसोटी, तीन वनडे आणि तीन टी20 सामने खेळले जाणार आहेत. ते दोन कसोटी सामने आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2023-25चा भाग असणार आहेत.
आशिया चषक
ऑस्ट्रेलिया पुन्हा सप्टेंबरमध्ये भारताचा दौरा करणार आहे. त्यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. याच महिन्यात आशिया कप 2023 खेळला जाणार असून जो वनडे विश्वचषकामुळे वनडे सामन्यांच्या प्रकारात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे.
वनडे विश्वचषक
आशिया कपनंतर वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. ज्यामध्ये 10 सहभागी संघांना 9 साखळी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा भारत दौऱ्यात 3 टी20 सामने खेळणार आहेत. वर्षाच्या शेवटी भारत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये दोन कसोटी सामने खेळणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये 15 वर्षीय मानस धामणेला वाईल्ड कार्ड प्रदान
भारत पुन्हा भिडणार पाकिस्तानशी! पहिल्यांदाच संपूर्ण वनडे वर्ल्डकप भारतात