भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी (25 जुलै) 2023-24 दरम्यान मायदेशात होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले. एकून 16 आंतरराष्ट्रीय सामने भारतीय संघ मार्च 2024 पर्यंत खेळायचे आहेत. वेळापत्रकातील शर्वात पहिली मालिका आहे ती भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील.
यावर्षी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) आयसीसी वनडे विश्वचषकाचे (ICC ODI WC 2023) यजमानपद भूषवणार आहेत. वनडे विश्वचषकासोबत महत्वाच्या द्विपक्षीय मालिकांचेही यजमानपद बीसीसीआयकडे आहे. वनडे विश्वचषक 2023ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे, तर अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. यजमान संघ भारत आणि ऑस्ट्रेलिया हे विश्वचषक ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. बीसीसीआयनेही बलाढ्य संघ निवडून विश्वचषकाआधी वनडे मालिकेचे आयोजन केले आहे.
वनडे विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियन संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतात दाखल होणार आहे. उभय संघांतील पहिला वनडे सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीमध्ये खेळला जाईल. मालिकेतील दुसरा वनेड सामना 24 सप्टेंबर रोजी इंदोरमध्ये, तर तिसरा वनडे सामना 27 सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये आयोजित केला गेला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ वनडे विश्वचषकाच्या तायरीला सुरुवात करेल. उभय संघांतील या वनडे मालिकेमुळे भारतासह ऑस्ट्रेलियन संघाचीही विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर चांगली तयारी होईल.
ऑस्ट्रेलियन संघाचा हा दौरा केवळ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर थांबणार नाही. विश्वचषक नोव्हेंबर महिन्यात संपल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 23 नोव्हेंबर रोजी वायझॅग स्टेडियवर खेळला जाईल. दुसरा सामना 26 नोव्हेंबर रोजी त्रिवेंद्रममध्ये खेळला गेला. तिसरा सामना 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी, तर चौथा सामना 1 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये खेळला जाईल. मालिकेतील शेवटचा टी-20 सामना 3 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये आयोजित केला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियन संघाच्या भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
पहिला वनडे सामना – सप्टेंबर 22 (मोहाली)
दुसरा वनडे सामना – सप्टेंबर 24 (इंदोर)
तिसरा वनडे सामना – सप्टेंबर 27 (राजकोट)
पहिला टी-20 सामना – नोव्हेंबर 23 (वायझॅघ)
दुसरा टी-20 सामना – नोव्हेंबर 26 (केरळ)
तिसरा टी-20 सामना – नोव्हेंबर 28 (गुवाहाटी)
चौथा टी-20 सामना – डिसेंबर 1 (नागपूर)
पाचवा टी-20 सामना – डिसेंबर 3 (हैदराबाद)
बीसीसीआयने जाहीर केलेल्या संपूर्ण वेळापत्रकात ऑस्ट्रेलियाव्यतिरिक्त अफगाणिस्तान आणि इंग्लंड संघाचेही वेळापत्रक दिले गेले आहे. विश्वचषकानंतर अफगाणिस्तान संघ तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी, तर इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौरा करणार आहे. (Schedule of the Australian team’s India tour ahead of the World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! हरमनप्रीतला भोवली आपली वागणूक, पुढच्या दोन सामन्यांमध्ये कॅप्टनवर आयसीसीकडून बंदी
माजी कर्णधाराच्या विधानाने माजली खळबळ! सांगितली वॉर्नर-स्मिथच्या निवृत्तीची तारीख