भारतीय क्रिकेट संघाचे अनेक कर्णधार झाले. परंतु खूप कमी कर्णधार असे होते, ज्यांना संघाच्या नेतृत्त्वाची धुरा खूप काळ वाहता आली. त्यातही भारताचे सर्वात यशस्वी कर्णधार म्हटलं की सौरव गांगूली, एमएस धोनी व विराट कोहलीचं नाव घेतलं जातं.
परंतु हे तिघेही खेळाडू कर्णधार होण्याआधी एक अजब गोष्ट या तिघांबद्दलही घडली होती.
१९९९ मध्ये टोंटन येथे विश्वचषकात सौरव गांगुलीने श्रीलंका संघाविरुद्ध १८३ धावांची खेळी केली. या सामन्यात भारताने श्रीलंकेला धुळ चारली. त्यानंतर बरोबर १ वर्षांनी गांगुली भारतीय वनडे व कसोटी संघाचा कर्णधार झाला.
त्यानंतर ६ वर्षांनी अर्थात २००५मध्ये एमएस धोनी या नव्या दमाच्या खेळाडूने श्रीलंका संघाविरुद्धच जयपुर येथे नाबाद १८३ धावांची खेळी केली. यात त्याने १५ चौकार व १० षटकार मारले. बरोबर २ वर्षांनी अर्थात २००७मध्ये धोनीला वनडे व टी२० संघाचे कर्णधार करण्यात आले. २००८मध्ये धोनी कसोटी संघाचाही कर्णधार झाला.
२०१२मध्ये ढाका वनडे विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध शानदार १८३ धावांची खेळी केली. या सामन्यातही भारताने शानदार विजय मिळवला. यानंतर ३ वर्षांनी कोहलीला २०१५मध्ये भारतीय कसोटी संघाचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधारपद देण्यात आले तर २०१८मध्ये टी२० व वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. Score 183 runs in an ODI and become India’s next skipper.
भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
२६४- रोहित शर्मा
२१९- विरेंद्र सेहवाग
२०९- रोहित शर्मा
२०८*- रोहित शर्मा
२००*- सचिन तेंडूलकर
१८६*- सचिन तेंडूलकर
१८३*- एमएस धोनी
१८३- सौरव गांगुली
१८३- विराट कोहली
१७५*- कपिल देव
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी –
पुण्यातच १० हजार वनडे धावा करण्याची सचिनची संधी १९ वर्षांपुर्वी हुकली होती
मोठ्या क्रिकेटरच्या गाडीतून चोरी झाले पाकिट, चोराने केली मोठी शाॅपिंग
वनडेत शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना अशी कामगिरी करणारा सचिन जगातील एकमेव