---Advertisement---

९९पेक्षा जास्त चेंडू न खेळता सर्वाधिक शतके करणारे ५ खेळाडू

On: गुरूवार, एप्रिल 23, 2020 7:22 PM
---Advertisement---

आजपर्यंत आपण वनडेत अनेक विक्रम पाहिले आहेत. काही विक्रम हे आपण कधीही ऐकलेले नसतात तर काही विक्रम हे आपण कधी विचार केला नसेल असे असतात. 

असाच एक खास विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज एबी डी विलीयर्सच्या नावावर आहे. एबीने २२८ वनडेत २१८ डावात फलंदाजी करताना २५ शतके आणि ५३ अर्धशतके केली आहेत. 

ही २५ शतके करताना त्याने कधीही ९९ पेक्षा जास्त चेंडू घेतले नाहीत. जागतिक क्रिकटमध्ये शतक जसं जवळ येईल तसे बरेच खेळाडू संथ खेळतात. परंतु २५ शतके करताना कधीही ९९ चेंडू पेक्षा जास्त चेंडू न खेळल्यामुळे एक अजब विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. 

शाहिद आफ्रीदी तर ३००पेक्षा जास्त सामने खेळून कधीही वनडेत १०० चेंडू खेळू शकला नाही. ९९पेक्षा कमी चेंडूत वनडे कारकिर्दीतील सर्व शतके करणाऱ्या खेळाडूंमध्ये ईजाज अहमद (१०), शाहीद आफ्रिदी (०६), जाॅनी ब्रेस्टाॅ (६)  आणि जेपी ड्यूमीनी यांचा समावेश आहे. 

ट्रेंडिंग घडामोडी – 

ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषकाऐवजी होणार आयपीएल?

या कारणामुळे मास्टर ब्लास्टर साजरा करणार नाही वाढदिवस

केवळ २ वेळा कसोटीत फिरकीपटूंनी टाकल्या होत्या पहिल्या २ ओव्हर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment