मंगळवारी (दि. 04 जुलै) आयसीसी वनडे विश्वचषक 2023 क्वालिफायर फेरीतील सुपर 6 सामन्यात स्कॉटलंड संघाने झिम्बाब्वेला 31 धावांनी पराभूत केले. यामुळे झिम्बाब्वे संघ भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडला. श्रीलंका संघ आधीच वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी क्वालिफाय झाला आहे. अशाप्रकारे एकूण 9 संघ झाले आहेत, पण एक संघ अजूनही बाकी आहे. अशात नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड संघात शेवटच्या स्थानासाठी क्वालिफाय करण्यासाठी सामना खेळला जाणार आहे.
झिम्बाब्वे (Zimbabwe) संघ अधिकृतरीत्या वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कारण, त्यांचा नेट रनरेट घसरू थेट -0.099 झाला आहे. झिम्बाब्वे संघाला स्कॉटलंडपूर्वी श्रीलंकेविरुद्ध लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. झिम्बाब्वेचे 6 गुण होते, आणि त्यांचे दोन सामनेही शिल्लक होते. मात्र, ते दोन गुण मिळवण्यात अपयशी ठरले. त्यामुळे त्यांचे क्वालिफाय होण्याचे मार्ग बंद झाले. जर नेदरलँडने गुरुवारी (दि. 06 जुलै) स्कॉटलंड संघाला पराभूत केले, तर झिम्बाब्वे, स्कॉटलंड आणि नेदरलँड या तीन संघांचे 6 गुण होतील.
स्कॉटलंडची शक्यता जास्त
नेदरलँड संघाने जर 250 धावा केल्या, आणि स्कॉटलंड संघाला 83 किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभूत केले, तर त्यांना फायदा होईल. अशात स्कॉटलंडचा नेट रनरेट झिम्बाब्वेच्या खाली जाईल. मात्र, 83 किंवा त्याहून अधिक धावांच्या विजयामुळे नेदरलँडचा नेट रनरेट 0.33 इतका होईल, जो झिम्बाब्वेपेक्षा चांगला असेल.
त्यामुळेच संपूर्ण जगाचे लक्ष नेदरलँड विरुद्ध स्कॉटलंड सामन्यावर लागले आहे. स्कॉटलंडने सामना जिंकला, तर ते थेट विश्वचषकासाठी क्वालिफाय करतील. मात्र, स्कॉटलंड पराभूत झाला आणि अंतर कमी राहिले, तर त्यांच्याकडे क्वालिफाय करण्याची संधी असेल.
नेदरलँडसाठी मार्ग नाही सोपा
नेदरलँड संघाने 250 धावा केल्या आणि स्कॉटलंडने 31 किंवा त्यापेक्षा कमी धावांनी सामना गमावला, तरीही ते नेट रनरेटमध्ये पुढे राहतील. नेदरलँडला स्कॉटलंडपेक्षा चांगला नेट रनरेट हवा आहे. त्यामुळे त्यांना 32 किंवा अधिक धावांनी विजय मिळवावा लागेल. जर स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना 250 धावा केल्या, तर नेदरलँडला 44.1 षटकात आव्हान गाठावे लागेल. जर नेदरलँड संघाने लवकर आव्हानाचा पाठलाग केला, तर त्यांचा नेट रनरेट स्कॉटलंडपेक्षा चांगला होईल. तसेच, त्यांना विश्वचषकाचे तिकीट मिळेल. (scotland and netherlands need to do to book the world cup 2023 spot)
महत्वाच्या बातम्या-
@100 Test: शंभराव्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी निवडली स्मिथची आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी, घ्या जाणून
‘टी20 विश्वचषकासाठी खेळाडूंना पारखण्याची…’, IPL गाजवणाऱ्या युवा भारतीयाचे विंडीज दौऱ्यापूर्वी मोठे विधान