अॅडलेड। भारताने सोमवारी(10 डिसेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या विजयानंतर आनंदी असणारा भारताचा कर्णधार विराट कोहली संघसहकाऱ्यांसह मैदानाबाहेर जात होता. त्याचवेळी आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने त्याला बोलवले आणि मैदानावरील सार्वजनिक घोषणेच्या वेळी वाजलेल्या धूनवर डान्स करतानाचा विराटचाच व्हिडिओ त्याला दाखवला.
विराटही तो व्हिडिओ पाहण्यासाठी थांबला आणि नंतर हसत मैदानाबाहेर गेला. त्यावेळी वॉर्नबरोबर अॅडम गिलख्रिस्टही होता.
हा व्हिडिओ वॉर्नने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन देताना वॉर्नने म्हटले आहे, कि माझा मित्र आणि दिग्गज विराट कोहलीने हे किती मस्त केले आहे.’ तसेच वॉर्नने विराटने त्याचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद म्हटले आहे आणि विराटमुळे त्यांचे फॉलोवर्स वाढतील, अशी मजेशीर टिप्पणी केली आहे.
https://www.instagram.com/p/BrNFXPKlbt0/
विराटचा अॅडलेड कसोटीतील तिसऱ्या दिवशीचा हा डान्सचा व्हिडिओ क्रिकेट आॅस्ट्रेलियाने सोशल मीडीयावर शेअर केला होता. त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.
Virat's loving it… #AUSvIND pic.twitter.com/JV0lxo4Aen
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2018
या सामन्यात भारताची चांगली सांघिक कामगिरी झाली आहे. भारताने पहिल्यांदाच आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. आता पुढील सामना 14 डिसेंबरपासून पर्थमध्ये सुरु होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–आयसीसी क्रमवारीत पुजारा, अश्विन, बुमराहची मोठी झेप तर सलामीवीरांची घसरण
–ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या स्पर्धेत नाणेफेकी ऐवजी या अनोख्या पद्धतीचा होणार अवलंब
–कसोटीमध्ये २०१८ वर्षातील षटकार किंग होण्याची रिषभ पंतला संधी