---Advertisement---

दुसरी मोठी विकेट! रोहित शर्मानंतर ‘हा’ क्रिकेटर करणार कसोटीला टाटा!

On: गुरूवार, मे 8, 2025 2:31 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मधून अचानक निवृत्ती जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये लोकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.

रोहित शर्मा पाठोपाठच आता विराट कोहली देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. स्पोर्ट्सइन्फोने दिलेल्या माहिती नुसार असे समोर आले आहे की, इंग्लंड सीरिज नंतर विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त होऊ शकतो. विराट कोहली निवृत्त होणार की नाही हे त्याचा इंग्लंड सीरिज मधील कामगिरी वरती अवलंबून आहे. विराटच्या चाहत्यांसाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आता सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे.

कोहलीने 2008 मध्ये एकदिवसीय पदार्पण केले आणि लवकरच त्याने भारतासाठी 50 शतकं केली. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणाऱ्यांपैकी एक आहे. त्याचे 80 शतकं (ODI+Test) आणि 103 (ODI+Test) अर्धशतकं, त्याच्या सातत्यपूर्ण फॉर्मचे प्रतिक आहेत.

कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये देखील प्रभावी कामगिरी केली आहे. त्याने 27 कसोटी शतकं केली आहेत, ज्यामुळे तो सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---