कूर्ग । अशिमा दुग्गल व तिची नेव्हीगेटर अमृती शेरगिल यांनी आपल्या पहिल्या दिवसाच्या आघाडीच्या जोरावर दिवाज ऑन व्हिल महिला कार रॅलीमध्ये चमक दाखवत आपली छाप पाडली. अशिमा व अमृता यांना दुसरा व शेवटचा दिवस थोडा अडथळ्याचा गेला. 3 मिनिटे व 28 सेकंद पेनल्टी त्यांना चिकमंगळूरु ते कूर्ग दरम्यान लागली. पण, इतर स्पर्धकांनी 2 मिनिटे 53 सेकंदची पेनल्टी मिळवली त्यामुळे या जोडीचे अव्वल स्थान पक्के झाले.
प्रफुल्ला के.एस.(संध्या चंद्रशेखरसोबत) यांनी चमक दाखवली. त्यांनी 1 मिनिटे 48 सेकंदसह दुसरे स्थान मिळवले.त्यांनी पहिल्या दिवशी 7 मिनिटे व 36 सेकंद वेळ नोंदवली होती. शोभा रवी (निलोफर इब्राहीमसोबत) याने 13 मिनिटे व 08 सेकंद पेनल्टीसह तिसरे स्थान मिळवले.
अव्वल तीन स्थान मिळवणा-या स्पर्धकांना रोख बक्षीसासोबत चषकही देण्यात येणार आहे आणि त्यांना पुढच्या दक्षिण डेअरमध्ये फ्री ड्राईव्हची संधी मिळेल. स्पर्धक महिलांना वर्षभराचा अनुभव आहे. पण, तरीही त्यांच्यामधील सुधारणा वाखाणण्याजोगी आहे असे टाईम स्पिड डिस्टन्सचे आयोजक जय दास मेनन म्हणाले.
अशिमा व अमृता यांच्यासाठी दुसरा दिवस हा आव्हानात्मक होता. त्यांच्यासमोर टाईम कंट्रोल्सचे मोठे आव्हान होते. आमच्यासाठी दिवस आव्हानात्मक होता आणि आम्ही चुका केल्याचे आम्हाला जाणवले असे अशिमा म्हणाली. आमच्यासाठी सुरुवातीचा दिवस चांगला होता. पण, तेव्हा निकाल लागला तेव्हा आम्हाला धीर आला असे ती पुढे म्हणाली. आम्ही थकलो असतो तर दुसरे स्थान मिळवले असते. पण, आम्ही यश मिळवले व आता प्रत्येक वेळी विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे अमृता म्हणाली.
बंगळूरु ते चिकमंगळूरुच्या ट्रॅकमध्ये चालकांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. देशभरातून सहभागी झालेल्या 30 स्पर्धकांसाठी अंतिम दिवस आणखीनच आव्हानात्मक होता. चिकमंगळूरु ते कूर्ग दरम्यान अनेक वेळणे, उंचवटे यांचा सामना संघांना करावा लागत होता. आम्ही पहिल्या दिवशी काही चुका केल्या. दुस-या दिवशी आम्ही सावधपणे कामगिरी केली व त्याचा फायदा झाला असे दुस-या स्थानी असणारी प्रफुल्ला म्हणाली.
निकाल :
1) अशिमा दुग्गल आणि अमृती शेरगिल -6 मिनिटे 21 सेकंद पेनल्टी गुण
2) प्रफुल्ला के.एस. आणि संध्या चंद्रशेखर (7.59)
3) शोभा रवी आणि निलोफर इब्राहीम (13.08)
महत्त्वाच्या बातम्या-
–तेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील
–न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया