भारतीय क्रिकेट संघाने ओव्हल कसोटीत ज्याप्रकारे दबावाचा सामना करत दुसऱ्या डावात शानदार पुनरागमन केले आणि ४५० पेक्षा जास्त धावा केल्या त्याबद्दल सर्वजण कौतुक करत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव अवघ्या १९१ धावांवर गुंडाळला गेला होता. अशा स्थितीत भारतीय संघासाठी पुनरागमन करणे खूप कठीण होते. पण विराट कोहलीच्या संघाने ते केले आणि १५७ धावांनी नेत्रदीपक विजयाची नोंद केली. या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडीही घेतली.
आता हे स्पष्टच आहे की भारतीय संघ ही मालिका गमावनार नाही, जर इंग्लंडने पुढील सामन्यात पुनरागमन केले तर ही मालिका बरोबरीत सुटेल. केनिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला होता. त्यानंतर इंग्लंडने २९० धावा केल्या आणि ९९ धावांची आघाडीही घेतली. कोणताही संघ अशा दबावाखाली येऊन मागे पडू शकला असता पण भारताने दुसऱ्या डावात ४६६ धावांचा मोठा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला विजयासाठी ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात इंग्लिश संघाचा दुसरा डाव २१० धावांवर गडगडला.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात २०० पेक्षा कमी धावा केल्यावर परदेशी भूमीवर खेळलेला कसोटी सामना जिंकला आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने अशीच कामगिरी केली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला डाव १८७ धावांवर आटोपला होता. पण जोहान्सबर्गमध्ये भारतीय संघाने हार मानली नाही आणि भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.
त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव फक्त १९४ धावांवर गुंडाळला. भारताने दुसऱ्या डावात २४७ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला २४१ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव अवघ्या १७७ धावांत गुंडाळला आणि घरच्या मैदानावर त्यांचा पराभव केला. भारताने तो कसोटी सामना ६३ धावांनी जिंकला होता. भुवनेश्वर कुमार सामनावीर ठरला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
किती रे मोठं मन तुझं! ‘सामनावीर’ पुरस्कार मिळूनही रोहित म्हणे, मी नाही खरा नायक तर ‘तो’ आहे
ऐतिहासिक विजयासह भारताची ‘गरुडझेप’, कसोटी चँपियनशीप गुणतालिकेत पुन्हा अग्रस्थानी; पाकिस्तानला पछाडले