पुणे, 20 जानेवारी 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी बास्केटबॉल लीग स्पर्धेत पुरूष गटात वॉरियर्स, विझार्ड्स,लेकर्स,राप्टर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून दुसरा विजय मिळवला.
पीवायसी बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत किड्स गटात पहिल्या सामन्यात वरद चितळे(4गुण) याने केलेल्या सुरेख कामगिरीच्या जोरावर निक्स संघाने हिटसंघाचा 4-2 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात हिट संघाने सेल्टिक्सचा 10-6 असा पराभव केला. विजयी संघाकडून रियान करंदीकर(4गुण)ने उत्कृष्ट कामगिरी बजावली. तिसऱ्या लढतीत सेल्टिक्स संघाने निक्स संघावर 3-2 असा विजय मिळवला.
पुरुष गटात वॉरियर्स संघाने किंग्सचा 26- 17 असा पराभव केला. वॉरियर्सकडून इशांत रेगे(17गुण)ने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात राप्टर संघाने बुल्स संघाचा 17-15 असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत अंकुर शहा 10 गुणांच्या जोरावर लेकर्स संघाने किंग्स संघाचा 14-13 असा पराभव केला. विझार्ड्स संघाने हॉक्स संघावर 31-6 असा सहज विजय मिळवला.
महिला गटात सान्वी घोलप(13गुण)च्या अफलातून खेळीच्या जोरावर मर्क्युरी संघाने एसेस संघाचा 18-14 असा पराभव करून विजयी सलामी दिली. (Second win for Warriors, Wizards, Lakers, Raptors in first basketball league tournament)
निकाल: साखळी फेरी: किड्स गट:
निक्स: 4(वरद चितळे 4) वि.वि.हिट: 2(विहान कोठारी 2); हाफ टाईम: 4-2;
हिट: 10(रियान करंदीकर 4)वि.वि.सेल्टिक्स: 6(अंकिता कोरे 4); हाफ टाईम: 2-0;
सेल्टिक्स: 3 (राघव कशेडीकर 2)वि.वि.निक्स: 2 (इंद्रनील त्रिमल 2); हाफ टाईम: 2-0;
महिला गट:
मर्क्युरी: 18 (सान्वी घोलप 13)वि.वि.एसेस: 14 (अनुषा सोनटक्के 9); हाफ टाईम: 13-10;
पुरुष गट:
वॉरियर्स: 26(इशांत रेगे 17)वि.वि.किंग्स: 17 (निरंजन महाजन 10); हाफ टाईम: 18-07;
राप्टर: 17 (गौतम मालकर्णेकर 10)वि.वि.बुल्स: 15 (शार्दुल तारीख 7); हाफ टाइम: 10-06;
लेकर्स: 14(अंकुर शहा 10) वि.वि.किंग्स:13(निरंजन महाजन 11); हाफ टाईम: 7-4;
विझार्ड्स: 31(अपूर्व सोलंकी 12) वि.वि.हॉक्स:6(रोनित शेंडे 6); हाफ टाईम: 18-4;
वॉरियर्स: 33(ईशांत रेगे 17) वि.वि.माव्हरिक्स:21(किरण गर्गे 10); हाफ टाईम:15-11;
राप्टर: 10(आयुश धुत 4) वि.वि.हॉक्स: 8(रोनित शेंडे 6); हाफ टाईम:6-2;
रॉकेटस: 13(इशान भाले 8) वि.वि.किंग्स: 12(निरंजन महाजन 7); हाफ टाईम: 6-3.
ब्लेझर्स: 22( अक्षय गडकरी 16)वि.वि.राप्टर: 14 (नील जोशी 9); हाफ टाईम:11 -11
महत्वाच्या बातम्या –
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा । रिदमिक योगासनातील ‘कांस्य’ पदकाद्वारे महाराष्ट्राच्या पदकाची बोहनी
घटस्फोट शोएब मलिककडून मिळाला नाही! सानियाने निवडला वेगळा मार्ग, टेनिस स्टारच्या वडिलांची माहिती