पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10 वर्षाखालील राज्य मानांकन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या फेरीत चौदाव्या मानांकित इथन लाहोटीने शर्वीन गंगाखेडकचा 6-3 असा तर अकराव्या मानांकित केशव भय्याने क्रेशिव शर्मचा 6-2 असा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
निगडी टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत तेराव्या मानांकित आरव शाहने आहान जैनचा 6-3 असा तर दहाव्या मानांकित विहार सोनावणेने स्पर्श पाटीलचा 6-4 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. लक्ष्य त्रिपाठीने अद्विक वेडेकरचा तर रेयांश गुंडने निव बन्सालीचा 6-3 असा पराभव केला. प्रत्युश काळेने अभिमन्यू कांडेकरचा तर आदिनाथ कचरेने कियांश सपनाचा एकतर्फी झालेल्या लढतीत 6-0 असा सहज पराभव केला.
याआधी स्पर्धेचे उदघाटन स्पर्धा संचालक व पीसीएलटीएचे नंदकुमार रोकडे, स्पर्धा निरीक्षक प्रणव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी
विश्वतेज देशमुख वि वि यश माने 6-1
इथन लाहोटी(14) वि वि शर्वीन गंगाखेडकर 6-3
केशव भय्या (11) वि वि क्रेशिव शर्म 6-2
लक्ष्य त्रिपाठी वि वि अद्विक वेडेकर 6-3
आयुष देउसकर वि वि विश्रुत गुलाटी 6-2
रेयांश गुंड वि वि निव बन्साली 6-3
प्रत्युश काळे वि वि अभिमन्यू कांडेकर 6-0
आरव शाह(13) वि वि आहान जैन 6-3
विहार सोनावणे (10) वि वि स्पर्श पाटील 6-4
देव मुर्ती वि वि आरव मिरचंदानी 6-4
लव परदेशी वि वि तनुज संचेती 6-1
आदिनाथ कचरे वि वि कियांश सपना 6-0
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भारतात मला खूपच शाप दिले गेले, म्हणूनच…’ आयपीएल खेळलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक वक्तव्य
चीयरलीडरच्या ‘त्या’ आरोपामुळे आयपीएलची अब्रू चव्हाट्यावर आली
मुंबईची नैय्या पार लावलेला टीम डेव्हिड ऑस्ट्रेलियासाठी दिसू शकतो वर्ल्डकप खेळताना?






