कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांची वाहवा मिळवणारा खेळाडू म्हणजे वीरेंद्र सेहवाग होय. त्याने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी सामन्यांत जिंकायची सवय लावली. त्याच सेहवागने सध्या इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघासह गेलेल्या रोहित शर्माला खास सल्ला दिला आहे.
आपल्या विस्फोटक अंदाजासाठी जरी सेहवाग ओळखला जात असला तरी, यावेळी मात्र फलंदाजांना सल्ला देताना त्याने सांगितले की, जेव्हा तुम्ही इंग्लंडमध्ये खेळत असता, तेव्हा तुम्ही नव्या चेंडूंचा आदर करावा. 2002 साली जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, त्यावेळी नॉटिंगममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सेहवागने शानदार कामगिरी करित 183 चेंडूवर 106 धावांची खेळी केली होती.
यावेळी भारतीय कसोटी संघ इंग्लंडमध्ये असून आधी न्यूझीलंडविरुद्ध विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याची तयारी करत आहे. त्यानंतर त्यानंतर इंग्लडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका भारताला खेळायची आहे.
या मालिकेपूर्वी सेहवागने सांगितले की, भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्माला आपल्या डावाच्या सुरुवातीला सावधानता बाळगून राहिले पाहिजे.
एएनआय सोबत चर्चा करताना सेहवागने सांगितले, ‘जेव्हा मी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये सलामीला गेलो त्यावेळी मी जास्त आक्रमक धोरण बाळगले नव्हते. तिथल्या स्विंग परिस्थतीमुळे मी माझं शतक 150-160 चेंडूवर पूर्ण केले आणि जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तिथल्या परिस्थितीचा आणि नव्या चेंडूंचा आदर करावाच लागेल. सपाट खेळपट्टी आणि गवत असलेली खेळपट्टी या दोघांमध्ये बरेच अंतर असते. इंग्लंडमध्ये बऱ्याच गोष्टी वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. जर ढगाळ वातावरण असेल तर चेंडू कोणत्याही पद्धतीने हरकत करतो आणि जर मोकळं ऊन असेल तर फलंदाजी करणे सोपे जाते.
सेहवागने रोहित शर्माला सल्ला देताना सांगितले की, ‘त्याने इंग्लंडच्या परिस्थितीचा सन्मान केला पाहिजे आणि खराब चेंडूची वाट बघितली पाहिजे. सेहवाग म्हणाला, ‘रोहित इंग्लंडमध्ये भरपूर क्रिकेट खेळलाय आणि त्याच्याजवळ अनुभवाची बिलकुल कमतरता नाही आणि त्याला चांगलं माहितीये की काय करायला पाहिजे. परंतु माझा त्याला सल्ला राहील की, नव्या चेंडूला आदर देऊन खराब चेंडू टाकायची वाट बघ. 5 ते 10 षटकं तू चेंडू बघत रहा. नंतर खेळपट्टीवर स्थिर झाल्यावर आक्रमक खेळ करु शकतो.’
रोहित या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाकडून सलामीला उतरताना दिसेल. सध्या भारतीय संघ साऊथॅम्पटन येथे सराव करत आहे. भारताला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान खेळायचा आहे. त्यानंतर 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट कोहलीबरोबर ‘या’ कंपनीने वाढवला करार; फी म्हणून घेत होता ६-७ कोटी रुपये
पीएसएलमध्ये कॉलिन मुनरो-उस्मान ख्वाजाच्या जोडीने गोलंदाजांची केली यथेच्छ धुलाई, पाहा व्हिडिओ
वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत भविष्यात टीम इंडियात जागा मिळवू शकतात ‘या’ दिग्गजांची मुलं