जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या सामन्यात काही युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्तिथीमध्ये भारतीय संघ हा श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताचा संघ जाहीर केला आहे. या संघात अनेक नवीन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळणार आहे. या दोन्ही दौऱ्यांवरील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी निवडकर्तेही तिथे जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
निवडकर्ते असणार संघासोबत
भारतीय क्रिकेट संघ सध्या कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडच्या दौर्यावर आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात भारताचा आणखी एक संघ श्रीलंका दौर्यावर जाईल. येथे संघाला वनडे आणि टी-२० मालिका खेळायच्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, निवड समितीचे सदस्य दोन्ही दौऱ्यांवर खेळल्या जाणार्या सामन्यांतील खेळ पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच असे घडत आहे, जेव्हा एकाच देशातील दोन वेगवेगळे संघ दोन वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील सामने खेळणार आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारताचा प्रमुख संघ इंग्लंडमध्ये आहे. त्याचबरोबर शिखर धवनच्या नेतृत्वातील संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळण्यासाठी लवकरच श्रीलंकेला रवाना होणार आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा इंग्लंडला रवाना होतील. दिलीप जोशी आणि हरविंदर सिंग हे निवड समितीचे दोन सदस्य इंग्लंडमध्ये चेतन शर्मासोबत असतील. निवड समितीचे अन्य दोन सदस्य अबया कुरुविला आणि देवाशीष मोहंती हे युवा भारतीय संघासोबत श्रीलंकेला जाणार आहेत. हे दोघेही सध्या भारतीय संघासोबत मुंबईच्या हॉटेलमध्ये विलगीकरणमध्ये आहेत.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात १३ ते १८ जुलैमध्ये एकदिवसीय मालिका होणार आहे आणि त्यानंतर २१ ते २५ जुलैमध्ये टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. हे सर्व ६ सामने एकाच मैदानावर खेळवले जाणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमला या सामन्यांचे यजमानपद देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
कसोटी पदार्पणात शतक ठोकल्यानंतर गांगुली झाला होता नर्वस, सचिनने ‘अशी’ केली होती मदत
दक्षिण आफ्रिकेच्या अव्वल गोलंदाजाने शोधली पुजाराच्या फलंदाजीतील चूक, वाचा काय म्हणाला
क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! ‘या’ टी२० लीगमध्ये युवराज, डिविलियर्स अन् गेल घालणार धुमाकूळ?