भारतीय संघाला बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नईमध्ये तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 21 धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यासह भारताने वनडे मालिकाही 1-2ने गमावली. विशेष म्हणजे, या मालिकेत सर्वात फ्लॉप ठरलेला भारतीय खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव होय. सूर्याला तिन्ही सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. तो पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला दोन वेळा मिचेल स्टार्कने, तर एक वेळा ऍश्टन एगर याने बाद केले. तिसऱ्या वनडेत सूर्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला होता. अशात भारतीय संघाचा माजी फलंदाज अजय जडेजा याने त्याला पाठिंबा दिला आहे.
संघ व्यवस्थापनावर जडेजाचा निशाणा
भारतीय संघाचा माजी फलंदाज अजय जडेजा (Ajay Jadeja) याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे समर्थन केले आहे. त्याने संघ व्यवस्थापनावर निशाणा साधला. कारण, त्यांंनी सूर्याला खालच्या फळीत फलंदाजीला पाठवले. जडेजाच सूर्याच्या फलंदाजी क्रमावरून नाखुश दिसले. त्यांनी म्हटले की, जडेजाला सातव्या स्थानी पाठवण्याचा निर्णय योग्य नव्हता.
The game has turned 😲
Ashton Agar snares Virat Kohli and Suryakumar Yadav off consecutive balls!#INDvAUS | 📝: https://t.co/ugxHxHyT1z pic.twitter.com/Ea4p9H9lc3
— ICC (@ICC) March 22, 2023
जडेजाने एका क्रिकेट वेबसाईटशी बोलताना सांगितले की, “तुम्ही संधी दिली. काही लोकांचे असे मत होते की, त्याने खेळायला नको होते. मात्र, तुम्ही त्याला निवडले. तसेच, त्यासोबत एक गोंधळही होता, हेही खरं आहे. हे तुमच्या निर्णयावरून दिसत आहे. तुम्ही विचार केला की, ‘तो फॉर्ममध्ये नाहीये, तर आपण त्याला यावेळी फलंदाजीसाठी पाठवू शकत नाही, कारण, तो स्विंगविरुद्ध खेळण्यात अपयशी ठरला आहे.’ जेव्हा तो शेवटी फलंदाजीला आला, तेव्हा खेळ आणखी कठीण झाला होता.”
‘एवढी प्रतीक्षाही चांगली नसते’
पुढे बोलताना जडेजा म्हणाला की, “जेव्हा तुमची वेळ चांगली असते, तेव्हा फलंदाजाला वाट पाहायला लावण्याने काही फरक पडत नाही. मात्र, जर त्याचा फॉर्म चांगला नसेल आणि तुम्ही त्याला फलंदाजीसाठी प्रतीक्षा करायला भाग पाडले, तर त्याचे लक्ष भरकटते. शेवटी तोदेखील एक माणूस आहे.”
‘विचार करण्याची बाब’
“हा तोच सूर्यकुमार आहे, जो मैदानात 360 अंशात धावा करतो. असे नाहीये की, त्याला खेळायचे कसे माहिती नाही. हा फक्त त्याचा विचार आहे. ज्यावेळी विराट कोहली यासारखा कोणताही खेळाडू अनेक महिने फॉर्ममध्ये नसतो, याचा अर्थ असा की, डोक्यात असे काही चालले आहे, जे तुमच्या खेळावर परिणाम करत आहे. जर तुम्ही जास्त विचार करत असाल आणि तुम्ही त्या खेळाडूला जास्त प्रतीक्षा करायला भाग पाडत असाल, तर गोंधळ वाढणारंच.”
सूर्यकुमार यादव तिन्ही सामन्यात फ्लॉप
विशेष म्हणज, टी20 क्रिकेटमध्ये गोलंदाजांना घाम फोडणारा सूर्यकुमार यादव वनडे क्रिकेटमध्ये धावा काढताना संघर्ष करताना दिसत आहे. सूर्याला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भोपळाही फोडता आला नाही. तो प्रत्येक सामन्यात एक चेंडू खेळून विकेट गमावून बसला. वनडे क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होणारा सूर्यकुमार जगातला पहिलाच फलंदाज बनला. (sending suryakumar yadav at number 7 was not a wise decision says former cricketer ajay jadeja)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रकर्तव्य प्रथम! आयपीएलआधी धोनीने निभावली देशसेवेची जबाबदारी, आर्मी कॅम्पमध्ये लावली हजेरी
भारतीय खेळाडूंना दुखापतीतून मुक्त करायचंय? तर बीसीसीआयला शास्त्री गुरुजींचा ‘हा’ फंडा वापरावाच लागेल