सेनेगलचा माजी मिडफिल्डर पापा बौबा डिओप याचे दीर्घ आजाराने निधन झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तो ४२ वर्षांचा होता.
डिओप २००२ च्या विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात सेनेगलकडून तत्कालीन गतविजेत्या फ्रान्सविरुद्ध गोल नोंदविण्यासाठी ओळखला जातो. त्या स्पर्धेत सेनेगल उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचले होते. पण त्यांना उपांत्यपूर्व सामन्यात तुर्कीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
डिओपने २००८ ला एफए कप पोर्ट्समाऊथकडून जिंकला होता. तसेच तो लेन्स, फुलहॅम, वेस्ट हॅम युनायटेड आणि बर्मिंघॅम सिटी या क्लब संघांकडूनही खेळला.
तसेच सेनेगलकडून खेळताना त्याने ६३ सामन्यात ११ गोल केले आहेत.
त्याच्या निधनानंतर सेनेगलचे अध्यक्ष मॅकी साल यांनी म्हटले आहे की त्यांच्या देशासाठी हे मोठे नुकसान आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने मॅराडोना यांच्यामुळे १० नंबरची जर्सी घालायला केली होती सुरुवात
“एक दिवस आकाशात फुटबॉल खेळूया”, मॅराडोना यांना पेलेंची अनोखी श्रद्धांजली
“एक दिवस आकाशात फुटबॉल खेळूया”, मॅराडोना यांना पेलेंची अनोखी श्रद्धांजली