पुणे : महाराष्ट्राच्या पृथ्वीराज मोहोळ आणि सोनबा गोगाणे यांनी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आपल्याला प्रतिस्पर्ध्यावर मात करून सुवर्णपदक मिळवले.
कै.विठोबा मारुती पठारे क्रीडा संकुल खराडी येथे ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्घाटन भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी आमदार बापुसाहेब पठारे , पंढरीनाथ पठारे , योगेश दोडके, संदीप भोंडवे, स्पर्धा प्रमुख व्ही. एन. प्रसुद , पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे , मेघराज कटके , नवनाथ घुले , सचिन पलांडे, ज्ञानेश्वर कटके, स्पर्धा आयोजक सुरेंद्र पठारे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्रात २३ वर्षांनी सिनियर नॅशनल स्पर्धा होत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील कुस्तीगीर भविष्यात नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास दाखवला. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी या स्पर्धेत विजयी झालेले कुस्तीगीर हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचे नेतृत्व करतील असे सांगितले.
पहिल्या दिवशी फ्रीस्टाईल च्या लढती झाल्या. स्पर्धेतील १२५ किलो गटात पृथ्वीराज मोहोळने अंतिम लढतीमध्ये दिल्लीच्या लक्ष शेरावतवर २ – १ अशा गुणांनी मात करून सुवर्णपदक मिळवले. यानंतर ५७ किलो गटाच्या अंतिम फेरीत दिल्लीच्या राहुलने महाराष्ट्राच्या आतिष तोडकरला पराभूत केले. त्यामुळे तोडकरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यानंतर ९७ किलो गटाच्या अंतिम फेरीत कर्नाटकच्या सुनील फडतरेने महाराष्ट्रच्या प्रतीक जगतापवर मात केली. ६१ किलो गटात वैभव पाटील आणि ९२ किलो गटात संग्राम पाटील या महाराष्ट्रच्या मल्लांना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांना ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.
महाराष्ट्र तिसरा
या स्पर्धेत फ्रीस्टाईलमध्ये दिल्ली संघाने १६६ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर १४० गुणांसह महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
५७ किलो
प्रथम – राहुल ( दिल्ली )
द्वितीय – आतिष तोडकर ( महाराष्ट्र )
तृतीय – हीतेशकुमार ( हरियाणा )
तृतीय – जनार्दन यादव ( उत्तर प्रदेश)
६१ किलो
प्रथम – अभिषेक ढाका (उत्तर प्रदेश )
द्वितीय – निखिलकुमार (दिल्ली)
तृतीय – ललित कौशल्य (मध्य प्रदेश)
तृतीय – वैभव पाटील (महाराष्ट्र)
६५ किलो
प्रथम – सोनबा गोंगाणे (महाराष्ट्र )
द्वितीय – विजय मलिक (चंडीगड)
तृतीय – आयुष ओमवीर (उत्तर प्रदेश)
तृतीय – मनिष गोस्वामी (दिल्ली)
७० किलो
प्रथम – अभिमन्यू सिंग (दिल्ली)
द्वितीय – महेशकुमार (कर्नाटक)
तृतीय – शुभम सिंग (उत्तर प्रदेश)
तृतीय – मोहित अशोक (हरियाणा)
७४ किलो
प्रथम – सौरभ सेहरवाल (दिल्ली)
द्वितीय – तेजवीर सिंह (उत्तर प्रदेश)
तृतीय – रोहन नारायण (कर्नाटक)
तृतीय – बाॅबी चहर (चंडीगड)
७९ किलो
प्रथम – परविंदर सिंह (हरियाणा)
द्वितीय – सदाशिव नलावडे (कर्नाटक)
तृतीय – रितीक पनवर (उत्तर प्रदेश)
तृतीय – मोहित राजकुमार (दिल्ली)
८६ किलो
प्रथम – जाॅन्टी सिंग (उत्तर प्रदेश)
द्वितीय – गोपाल कोली (कर्नाटक)
तृतीय – अभिषेक यादव (गुजरात)
तृतीय – आशिष कुमार (दिल्ली)
९२ किलो
प्रथम – कुणालकुमार (हरियाणा)
द्वितीय – अजय बाल सिंग (हिमाचल)
तृतीय – दीपक सिंग (राजस्थान)
तृतीय – संग्राम पाटील (महाराष्ट्र)
९७ किलो
प्रथम – सुनिल फडतरे (कर्नाटक)
द्वितीय – प्रतिक जगताप (महाराष्ट्र)
तृतीय – तरुण आचार्य (मध्यप्रदेश)
तृतीय – नदीम इकबाल (जम्मू-कश्मीर)
१२५ किलो
प्रथम – पृथ्वीराज मोहोळ (महाराष्ट्र)
द्वितीय – लक्ष शेरावत (दिल्ली)
तृतीय – समीर सतिश (हरियाणा)
तृतीय – भरत सिंग (उत्तर प्रदेश)
(Senior Group National Championship Wrestling Tournament. Prithviraj of Maharashtra, Sonba won the gold medal)