पुणे : सिटी प्रिमियर लीग (सीपीएल) सेव्हन अ साईड फुटबॉल स्पर्धेच्या पाचव्या पर्वास प्रबल पॅंथर्स संघाने दोन सामने जिंकून आपल्या मोहिमेस झकास सुरुवात केली. आदित्य ऑलस्टारप्स, निरागस नाईटस, डायमंड डॅगर्स संघांनी देखिल विजयी सुरुवात केली.
स्पोर्ट्स फाउंडेशन पुणेच्या वतीने सिटी एफसी पुणे या स्पर्धेचे आयोजन करत आहे. प्रबल पँथर्स संघाने १५ वर्षांखालील गटात दोन सामने जिंकून आपली बाजू भक्कम केली. प्रबल पँथर्सने सात्विक नायक (५वे मिनिट) आणि राघवेंद्र शानभागेने (१८वे मिनिट) नोंदवलेल्या गोलवर सक्सेस स्ट्रायकर्सवर २-० असा विजय मिळवला. त्यानंतर पॅंथर्सने सात्विक नायक (८वे मिनिट) आणि आर्यन स्वामीने (११वे मिनिट) केलेल्या गोलच्या जोरावर ज्योती जग्वार्सला २-० असे हरवले.
स्पर्धेतील ९ वर्षांखालील गटात डायमंड डॅगर्सने प्रबल पँथर्सचा २-१ असा पराभव केला. डायमंड डॅगर्ससाठी अनुज शिरोत्रेने (६ आणि ११वे मिनिट) दोन गोल केले. पँथर्सकडून अयांश पांञरे यालाच गोल करण्यात यश आले. पुढे ११ वर्षांखालील विभागात, निरागस नाईट्सने लव फुलसुंदरच्या (१०वे मिनिट) एकमात्र गोलच्या जोरावर जीएनएस गनर्सचा १-० असा पराभव केला. प्रत्येक सामना २४ मिनिटांच्या खेळला जात असून, १२ मिनिटाचे एक सत्र आहे.
निकाल –
९ वर्षाखालील : डायमंड डॅगर्स: २ (अनुज शिरोत्रे ६, ११वे मिनिट) वि.वि. प्रबल पँथर्स: १ (आयांश पांढरे ९वे मिनिट)
११ वर्षांखालील: निरागस नाइट्स : १ (लव फुलसुंदर १०वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स : ०
१३ वर्षांखालील : आदित्य ऑलस्टार्स: 2 (माधव अभय ७वो मिनिट रुद्र घंटेलू १४वे मिनिट) वि.वि. डायमंड डॅगर्स : १ (दक्ष खेडेकर १६वे मिनिट स्वयं गोल)
१५ वर्षांवरील: प्रबल पँथर्स : २ (सात्विक नायक ५वे, राघवेंद्र शानभागे १८वे मिनिट) वि.वि. सक्सेस स्ट्रायकर्स : ०
प्रबल पँथर्स : २ (सात्विक नायक ८वे मिनिट, आर्यन स्वामी ११वे मिनिट) वि.वि. ज्योती जग्वार्स: ०
टीएमपी टायगर्स : २ (राज पटेल ५वे मिनिट, आनविक मोदी ११वे मिनिट) वि.वि. जीएनएस गनर्स : 0
(Seven A Side Football | A great opening for the Panthers team )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘महाराष्ट्र केसरी’ला महिंद्रा थार जीपचे बक्षीस
सूर्याने सांगितले आपल्या ‘सिक्रेट कोच’चे नाव! दिले आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे श्रेय