सोमवारी, 9 जुलैला बीसीसीआयने बेंगलोरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) मध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी मुलाखती घेतल्या आहेत.
एनसीएमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी जवळजवळ 7 अर्ज आले होते. त्यातील दोन अर्ज हे डब्ल्यूव्ही रमण आणि नरेंद्र हिरवाणी यांचेही होते.
हे दोघेही 2016 मध्ये एनसीएमध्ये सामील झाले होते. पण त्यांचा करार 14 मार्चला संपुष्टात आला. मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समितीच्या (सीओए) बैठकीनंतर त्यांच्या करारात तीन महिन्याची वाढ करण्यात आली होती.
डब्ल्यूव्ही रमण आणि नरेंद्र हिरवाणी यांच्या बरोबरच सुनील जोशी, सुजीत सोमासुंदर, दिवाकर वासु, एम वेंकटरमना आणि रमेश पवार यांच्याही फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी मुलाखती झाल्या आहेत.
या मुलाखती बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी, अध्यक्ष राहुल जोहरी, डायना एडलजी(सीओए) आणि सबा करीम (व्यवस्थापक, बीसीसीआय) यांनी घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या:
-इशांत शर्माने सांगितला धोनी आणि कोहलीमधील फरक
-टी20मध्ये केल्या २७० धावा, आयसीसी म्हणते तरीही हा विक्रम नाही
-गांगुली म्हणतो, विराट तू वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी कर!