---Advertisement---

रोहित-गिलचे खराब प्रदर्शन ते अश्विनला बाहेर बसवण्यापर्यंत, ‘या’ आहेत WTC Finalमधील भारताच्या चुका

On: रविवार, जून 11, 2023 10:28 PM
Team India (WTC final)
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रविवारी (11 जून) भारताला डब्ल्यूटीसी 2021-23च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव मिळाला. बुधवारी (7 जून) सुरू झालेल्या या सामन्यात भारताने विजयासाठी प्रयत्न केले. पण संघाने केलेल्या चुका त्यांना माहागात पडल्या. आपण या लेखात भारतीय संघाला डब्ल्यूसीचीच्या अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवाची 7 प्रमुख कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

भारतीय संघ यावेळी सलग दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात खेळला आणि पराभूत झाला. मागच्या वेळी भारताला न्यूझीलंडकडून, तर यावेळी ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ अगदी पहिल्या दिवसापासून भारतापेक्षा भक्कम स्थितीत होता.

भारताच्या पराभवाची सात प्रमुख कारणे
1. रोहित शर्मा –
भारतीय संघाला मिळालेल्या पराभवात सर्वात मोठा वाटा जर कुणाचा असेल, तर तो स्वतः कर्णधार रोहित शर्मा () याचाच म्हणावा लागेल. रोहितने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. क्रिकेटचे जाणकार असे म्हणतात की कसोटीत चौथ्या डावात फलंदाजी करणे म्हणजे मोठे आव्हान आहे, पण तरीही रोहितने हा धाडसी निर्णय घेतला आणि संघाला त्याची किंमत मोजावी लागली. सोबतच फिरकीपटून रविचंद्रन अश्विन () यालाही रोहितने प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करून घेतले नाही. जगातिल सर्वोत्तम कसोटी गोलंदाज अशी ओळख असणाऱ्या अश्विनला खेळपट्टीचे कारण देत संघातून बाहेर बसवणे भारताला महागात पडले. कारण संघातील वेगवान गोलंदाजही काही खास कामगिरी करताना दिसले नाहीत. उलट ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नेथन लायन याने एकूण पाच बळी या सामन्यात घेतल्या.

गोलंदाजी आक्रमाणाकडून सर्वोत्तम प्रदर्शन करून घेणे ही कर्णधाराची जबाबदारी असते. रोहित मात्र या बाबतीत अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासारख्या महत्वाच्या वेळीही भारतीय गोलंदाज विरोधी संघाच्या धावांना बांध घालू शकले नाहीत. यात कुठे ना कुठे रोहित देखील कमी पडल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथ, तर दुसऱ्या डावात ऍलेक्स केरी आणि मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचे योगदान देऊ शकले.

2. चेतेश्वर पुजारा –
इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये न खेळणारा चेतेश्वर पुजारा () काउंटी क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. 2022 काउंटी हंगामात त्याने आठ सामन्यांमध्ये 1094 केल्या होत्या. तर यावर्षी कर्णधार म्हणून खेळताना काउंटीतील चार डावांमध्ये तीन शतके ठोकली. काउंटी क्रिकेटमधील चमकदार कामगिरीनंतर पुजाराला डब्ल्यूटीसी फायनलसाठी संघात सामील केले गेले. मात्र, त्याने या महत्वाच्या सामन्यात चाहत्यांची चांगलीच निराशा केली. संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर केळायला येणारा पुजारा, या सामन्यातील पहिल्या डावात 14, तर दुसऱ्या डावात 27 धावा करून बाद झाला. त्याची सुमार केळीचा परिणाम संघाच्या एकंदरीत प्रदर्शनावर देखील झाल्याचे पाहायला मिळाले.

3. शुबमन गिल –
नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2023मध्ये शुबमन गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. गिल मागच्या काही काळात भारतीय संघाचे भविष्य म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशात डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासारख्या महत्वाच्या प्रसंगी सर्वांनाच त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याने या सामन्यातील पहिल्या डावात 13, तर दुसऱ्या डावात 18 धावा करून विकेट गमावली. आयपीएल हंगामा त्याने मारलेल्या तीन शतकांमुळे चाहत्यांच्या गिकडून असलेल्या अपेभा वाढल्या असल्या, तरी डब्ल्यूटीसी फायनलमधील त्याची खेळी खूपच निराशाजन ठरली.

4. केएस भरत –
भारताचा नियमित यष्टीरक्षक रिषभ पंत दुखापतग्रस्त असल्यामुळे डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात केएस भरत याला संघात घेतले गेले. मात्र, भरत या संधीला साजेसे प्रदर्शन करताना दिसला नाहीये. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात त्याने अनुक्रमे 5 आणि 23 धावांवर विकेट गमावली. आतापर्यंत खेळलेल्या पाच कसोटी सामन्यांमधील आठ डावात त्याने 18.43च्या सरासरीने 129 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे यात एकही अर्धशतक नाहीये. अशात संघातील पंतची कमी भरून काठण्यात त्याला पूर्णपणे अपयश आल्याचेच दिसते.

5. भारताचे गोलंदाजी आक्रमण –
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात मिळवली होती. पहिल्या आडीच तासात ऑस्ट्रेलियाने तीन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर गोलंदाजांची लाईन आणि लेंथ बिघडली. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमेश यादव या तिघांनी कसोटी क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. पण तरीदेखील ऑस्ट्रेलियन फलंदाजांपुढे ते अपयशी ठरताना दिसत होते. गोलंदाजांकडे पहिल्या तीन विकेट्सनंतर कुठलीच रणनीती नसल्याचे वाटत होते. ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथ यांना वैयक्तिक शतके करत भारतीय गोलंदाजांचा अक्षरशः घाम काढला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मिळवलेली आघाडी शेवटर्यंत कायम राहिली आणि भारताला पराभव स्वीकारावा लागाल.

6. चुकीचे शॉट सिलेक्शन –
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात एकीकडे ऑस्ट्रेलियन संघसाठी त्यांचे फलंदाज अप्रतिम प्रदर्शन करत होते. तर दुसरीकडे भारतीय फलंदाज कोणत्या चेंडूवर विकेट गमावतील, याचा नेम नव्हता. स्वतः कर्णधार रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे देखील चुकीचा शॉट खेळून विकेट गमावून बसले. पुजारा या सामन्यात चक्क अप्पर कट मारताना दिसला, ज्यामथ्ये विकेट त्याची विकेट गेली. तर रोहितने नेथन लायनल स्विप मारताना बाद झाला. विराट कोहली अनेकदा कव्हर ड्राईव्ह मारताना विकेट गमावून बसला आहे, जी चूक त्याने या सामन्यातही केली. अचूक शॉट सिलेक्शनसाठी ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे देखील या सामन्यात चूक करताना दिसला.

7. नुकतीच पार पडलेली आयपीएल –
डब्ल्यूटीसी 2021-23 चा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील फक्त दोन खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसले. हे दोन खेळाडू होते डेविड वॉर्नर आणि कॅमरून ग्रीन. दुसरीकडे चेतेश्वर पुजारा वगळता भारताचा संपूर्ण संघ आयपीएलमध्ये व्यक्त होता. आयपीएलमुळे संघ इंग्लंडमध्ये उशिरा पोहोचला आणि याठिकाणी खेळाडूंना सरावासाठीही जास्त वेळ मिळाला नाही. टी-20 क्रिकेट मध्ये खेळाडूंना आक्रमक खेळ दाखवावा लागतो. तर दुसरीकडे कसोटीत मात्र संयमी खेळी करावी लागते. भारतीय खेळाडूंसाठी इतक्या कमी दिवसांमध्ये टी-20 मधून कसोटीसाठी स्वतःला तयार करणे कठीण होते. संघाच्या प्रदर्शनावर देखील यामुळे परिणाम झाल्याचे दिसले. (Seven Mistakes India Made in WTC Finals 2023)

महत्वाच्या बातम्या –
WTC Finalsमध्ये सर्वाधिक धावा करणारे 5 भारतीय फलंदाज, 18 महिन्यांनी कमबॅक करणारा रहाणे दिग्गजांवर भारी
WTC Final जिंकताच ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, पराभूत होऊनही भारताला ‘एवढ्या’ कोटींचे बक्षीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---