पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिसअजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पुण्यातील विविध क्लबमधील एकुण 44 संघांमध्ये 440हून अधिक खेळाडू सहभागी झाले असून ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे दि.10मार्च 2018 पासून सुरू होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे आणि पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे म्हणाले की, क्लबचे माजीअध्यक्ष व टेनिसप्रेमी कै. शशी वैद्य यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा सलग सातव्या वर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, स्पर्धेचे पीसीएमसी संघांचे सामनेपीसीएमसी येथे होणार आहे.
स्पर्धेत एकुण 75हजार रूपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्या संघाला 40 हजार रूपये व करंडक , तर उपविजेत्या संघाला 15हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे स्पर्धेचे संयोजन सचिव अभिषेक ताम्हाणे यांनी सांगितले.
स्पर्धेत गतविजेता पीवायसी अ, उपविजेता पीवायसी ब, पीवायसी क, मगरपट्टा अ, पूना क्लब आणि एमडब्लूटीए या संघांचा एलाईट गटामध्ये समावेशआहे. याशिवाय प्लेट गटातील तीन संघ एलाईट गटात समावेश करण्यात येणार आहे.
तसेच, ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. दुहेरीचे 4 सामने खुल्या गटात होणार आहेत. दोन सामने 90 अधिक व 100 अधिक या गटात होणार आहेत. शहरातील हौशी टेनिसखेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये किशोर पाटील, डॉ.सुधीर भाटे, सुंदर अय्यर, अभिषेक ताम्हाणे, हेमंत बेंद्रे, उत्सव मुखर्जी,जयंत कढे आणि कौस्तुभ शहा यांचा सहभाग आहे.