पाकिस्तान संघ सध्या नेदरलंड दौऱ्यावर आहे. याठिकाणी यजमान संघासोबत त्यांना तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. यूरोपीय देशांमध्ये क्रिकेट आजही फुटबॉलच्या तुलनेत कमी लोकप्रिय आहे. इंग्लंड त्याठिकाणचा धुरंधर संघ आहे, पण त्याव्यतिरिक्त मुख्य युरोपीय देशांमध्ये क्रिकेट लोकप्रियता मिळण्यासाठी अजून मोठा काळ जावा लागेल. पाकिस्तान संघाची नेदरलंड दौऱ्यात ऍजेक्सचा दिग्गज गोलकिपर एडविन वान डर सार यांच्याशी भेट झाली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमची एका खास अंदाजात त्यांच्याशी ओळख करून दिली गेली.
एडविन वान डर सार (Edwin van der Sar) ऍजेक्स (Ajax) संघाव्यतिरिक्त मॅनचेस्टर युनायडेट संघासाठी देखील खेळले आहेत. यादरम्यान शादाब खान (Shadab Khan) याने कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि एडविन यांची ओळख करून दिली. यावेळी त्याने आझमची तुलना फुटबॉलविश्वातील दिग्गज क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेसी यांच्याशी केली. शादाब म्हणाला की, “आझम क्रिकेटमधील क्रिस्टियानो आणि मेसी दोघेही आहे.”
शादाबने ज्या पद्धतीने बाबरची ओखळ करून दिली, ते पाहून प्रसंगी उपस्थित असलेले पाकिस्तानी खेळाडू हसू लागले. तसेच स्वतः बाबर देखील हसताना दिसला. दरम्यान, कर्णधार बाबर आणि पाकिस्तानचे काही खेळाडू नेदरलंडमधील सर्वोत्तम फुटबॉल क्लबच्या दौऱ्यावर गेले होते. हा क्लब एम्सटर्डमस्चे फुटबॉल क्लब, एजेक्स किंवा एएफसी एजेक्स या नावांनी ओखळला जातो. या क्लबने चार चॅम्पियन्स ट्रॉफी, तर विक्रमी ३६ वेळा डच इरेडिविसी स्पर्धा जिंकली आहे. यादरम्यान, दिग्गज एडविन आणि पाकिस्तानी खेळाडूंमध्ये खास चर्चा झाली.
रोनाल्डो आणि मेसी फुटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. या दोघांचे चाहते जगभरात आहे आणि सर्वांना त्यांची गुणवत्ता देखील माहिती आहे. एडविनला देखील बाबरच्या गुणवत्तेचा अंदाज यावा, यासाठी शादाबने या दोघांच्या नावाच उल्लेख करून त्याची ओखळ सांगितली. याप्रसंगी बाबर आझम, इमाम उल हक, हॅरिस राउफ आणि शादाब खान हे सर्वजन उपस्थित होते. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान क्लबमध्ये आला नसल्यामुळे एडविनने देखील खेळाडूंची फिरकी घेतली. गमतीमध्ये एडिवन म्हणाले की, ते स्वतः पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाची जबाबदारी स्वीकारू शकतात.
Bonding across sports 🤝
🔊🔛 Enjoy highlights of the 🇵🇰 team's trip to the home of @AFCAjax 👏 pic.twitter.com/Y0d0eje3hH
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 19, 2022
यावेळी बाबरने मॅनचेस्टर युनायटेडच्या माजी गोलकिपरला फलंदाजीचे धडेही दिले. पाकिस्तान संघ व्यवस्थापनाकडून त्यांना बॅट भेट दिली गेली. पाकिस्तान क्रिकेटने अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून याचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्यान, नुकताच बाबर आझम त्याच्या चुकीच्या इंग्रजीमुळे चर्चेत आला आहे. त्याचे मैदानातील प्रदर्शन जरी उत्कृष्ट असले तरी, इंग्रजीच्या बाबतीत तो खूपच कच्चा आहे. अशात त्याची तुलना रोनाल्डो आणि मेसीसोबत होऊ लागल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Even Sarfaraz used to speak better english than Babar Azam😂 https://t.co/mvK4S701J3
— Vaibhav Ingale (@vaibhav_tweetsz) August 18, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कुलदीपच्या विरोधात तब्बल १० वर्षांनंतर खेळतोय झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू, याआधी ‘या’ सामन्यात आले होते आमने-सामने
आशिया कपसाठीच्या झळाळत्या ट्रॉफीचे झाले अनावरण; मैदानावरील युद्ध २७ ऑगस्टपासून
टीम इंडियाला मिळणार आणखी एक कर्णधार! आता ‘हा’ खेळाडू सांभाळणार जबाबदारी