आयसीसी वनडे विश्वचषक 2023 हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 5 ऑक्टोबर रोजी भारतात ही सर्वात महत्वाची क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. यजमान भारतीय संघाला आपला पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळायचा आहे. विश्वचषकाचा माहोल तयार होत असतानाच पाकिस्तानचा 24 वर्षीय अष्टपैलू शादाब खान याने रोहित शर्मा याच्याविषयी खास प्रतिक्रिया दिली आहे.
शादाब खान (Shadab Khan) आगामी वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघाचा महत्वाचा खेळाडू असणार आहे. त्याने आतापर्यंत अनेक सामन्यांमध्ये पाकिस्तानसाठी मॅच विनरची भूमिरा पार पाडली आहे. आगामी वनडे विश्वचषकात यजमान भारताप्रमाणेच शेजारी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. शादाब विश्वचषकात पाकिस्तनचा महत्वाचा फलंदाज असला, तरी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे आव्हान त्याच्यासमोर असेलच. शादाबने स्वतः याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) यावर्षी पहिल्यांदाच वनडे विश्वचषकात कर्णधार म्हणून खेळणार आहे. मागच्या विश्वचषकात म्हणजेच 2019 साली त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. यावर्षीही विश्वचषकापूर्वी रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसला आहे. रोहितविषयी बोलताना शादाब खान म्हणाला की, “रोहित शर्मा खूपच खतरनाक आहे आणि एकदा खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर त्याला गोलंदाजी करणे खूपच कठीण होते. त्याला गोलंदाजी करायला मिला आवडते.”
दरम्यान, यावर्षी भारतीय संघ मायदेशात विश्वचषक खेळत असल्यामुळे संघाकडे 12 वर्षांनंतर विश्वचषक जिंकण्याची मोठी संधी आहे. भारताने आपला मागचा विश्वचषक 2011 साली जिंकला होता. त्यावेळी एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार असून अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला मात दिली होती. यावर्षी रोहित शर्मावर संघाला इतिहासातील आपला तिसरा विश्वचषक मिळवून देण्याची जबाबदारी असेल. रोहितसाठीही कर्णधार म्हणून कारकिर्दीतील पहिला विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. (Shadab Khan praised Rohit Sharma before the World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
VIDEO: हॉकीच्या मैदानावर क्रिकेटपटूंनी वाढवला हौसला! हरमन सेनेने चिरडले पाकिस्तानचे आव्हान
वर्ल्डकपआधी विदेशी दिग्गजाने गायले श्रेयसचे गुणगान, म्हणाला,”तो टीम इंडियाचा…”