---Advertisement---

यूएसएच्या 37 वर्षीय खेळाडूची कमाल, पाकिस्तानविरुद्ध 4 विकेट्स घेताच केला मोठा विक्रम नावावर

On: बुधवार, फेब्रुवारी 11, 2026 1:12 PM
---Advertisement---

यूएसए संघाने सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चे सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले, मात्र त्यांचा एक खेळाडू चांगलाच फॉर्ममध्ये आहे. काही खेळाडू वयाच्या ३७व्या वर्षी संन्यास घेण्याचा निर्णय घेतात, दुसरीकडे यूएसएचा वेगवान गोलंदाज त्याच्या कारकिर्दीच्या एका चांगल्याच उंबरठ्यावर उभा आहे. त्याने पाठोपाठ उत्तम कामगिरी करत नवा विक्रम केला आहे.

वॅन शाल्कविक शेडली याने सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात त्याच्या गोलंदाजीने फलंदाजांना हैरान करून सोडले आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ४ विकेट्स घेत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. त्याने या स्पर्धेची सुरूवातही ४ विकेट्स घेत केली होती. त्याने ही कामगिरी भारताविरुद्ध केली. त्यामुळे टी२० विश्वचषकाच्या लागोपाठ दोन सामन्यात प्रत्येकी ४-४ विकेट्स घेणारा तो केवळ दुसराच गोलंदाज ठरला आहे. याआधी अशी कामगिरी २०२४मध्ये अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीने केली आहे

शेडली महत्वाच्या क्षणी विकेट्स काढण्यात पटाईत आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सईम आयुब, सलमान आगा, शादाब खान आणि फहीम अशरफ यांना बाद केले. यावेळी त्याने ४ षटकात केवळ २५ धावा देत ही कामगिरी केली. विशेष म्हणजे त्याने या सामन्यातील एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या. भारताविरुद्धही त्याने असेच केले होते.

भारताविरुद्ध शेडलीने ४ षटकात २५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यातही त्याने एका षटकात ३ विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. यामध्ये त्याने ईशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंगला बाद केले होते. यामुळे तो सध्या या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील आहे. शेडलीची कामगिरी उत्तम असली तरी संघाने सामने गमावले आहेत.

शेडलीचा जन्म १९८८मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये झाला. क्रिकेटची सुरूवात त्याने आफ्रिकेतच केली, नंतर अमेरिकेत स्थायिक झाला. २०२४मध्ये त्याने यूएसएसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आतापर्यंत त्याने १३ वनडे आणि १६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने १७ विकेट्स घेतल्या असून टी२०मध्ये २३ विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---