स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या चीनमध्ये आहे. चीनच्या हांगझोऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 पार पडत आहेत. यातील महिला टी20 स्पर्धेचा पहिला उपांत्यपूर्व सामना गुरुवारी (दि. 21 सप्टेंबर) भारतीय महिला विरुद्ध मलेशिया महिला संघात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 100 हून धावांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा हिने अर्धशतक ठोकत इतिहास घडवला आहे.
शेफालीने घडवला इतिहास
या सामन्यात मलेशिया महिला संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यामुळे हा सामना 15 षटकांचा खेळवला गेला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकात 2 विकेट्स गमावत 173 धावा चोपल्या. यावेळी भारताकडून सलामीला फलंदाजी करताना स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शेफाली वर्मा (Shafali Verma) यांच्यात पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली. स्मृती 27 धावा करून बाद झाली. त्यानंतर शेफालीने जेमिमाह रॉड्रिग्ज हिच्यासोबत मिळून दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी झाली.
यावेळी शेफाली 39 चेंडूत 67 धावा करून बाद झाली. तिच्या खेळीत 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, शेफालीने हे अर्धशतक ठोकताच तिच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. शेफाली ही आशियाई क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात अर्धशतक ठोकणारी पहिली भारतीय ठरली.
Shafali Verma became the first Indian to score a fifty in Asian Games history.
– Shafali created history in China…!!!!! pic.twitter.com/V1ISHSQ0u7
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2023
शेफाली बाद झाल्यानंतर भारताचा डाव जेमिमा आणि ऋचा घोष यांनी सांभाळला. दोघींमध्ये 12 चेंडूत नाबाद 30 धावांची भागीदारी झाली. यावेळी जेमिमाने 29 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त ऋचानेही अवघ्या 7 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांचा पाऊस पाडत 21 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
यावेळी मलेशिया महिलांकडून गोलंदाजी करताना माहिरा इस्माईल आणि मास एलिसा यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. अशात मलेशिया महिलांना हा सामना जिंकण्यासाठी 174 धावा करायच्या आहेत. (shafali Verma india women vs malaysia women asian games womens t20i 2023 quarter final 1)
हेही वाचाच-
वर्ल्डकपपूर्वी कुलदीप यादव पुन्हा बागेश्वर बाबाच्या दर्शनाला, Asia Cupपूर्वीही घेतलेला आशीर्वाद
T20 World Cup 2024: क्रिकेटच्या महाकुंभमेळ्यासाठी यूएसएतील ‘3’ मैदानं फिक्स, लगेच वाचा