सध्या सुरू असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग लिलावात अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर मोठी बोली लागली. नुकत्याच झालेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपद मिळवून देणारी कर्णधार शफाली वर्मा हिच्यासाठी देखील दोन कोटींची बोली लागली. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला मागे टाकताना तिला आपल्या संघात सामील करून घेतले.
Welcome on board, say @DelhiCapitals to @TheShafaliVerma 👏 👏#WPLAuction pic.twitter.com/tgPNcvEYew
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 13, 2023
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात आक्रमक खेळाडूंपैकी ती एक आहे. कोणत्याही मैदानावर ती सहज षटकार वसूल करू शकते. तसेच अंडर 19 टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची ती कर्णधार आहे. अगदी कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने आपला दबदबा तयार केला असून, याच कारणाने तिला या लिलावात मोठी बोली लागणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
अपेक्षेप्रमाणे तिच्यावर चार संघांनी बोली लावली. एक कोटीच्या आसपास आरसीबीने माघार घेतल्यानंतर मुंबई व दिल्ली यांत तिच्यासाठी जोरदार रस्सीखेच झालेली पाहायला मिळाली. अखेर दिल्लीने 2 कोटी रुपये मोजत तिला दिल्लीकर बनवले. यातच संघात भारताची दुसरी युवा खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज हिचा देखील समावेश आहे.
(Shafali Verma Play For Delhi Capitals In WPL With 2 Crore)