भारतीय महिला आणि इंग्लंड महिला संघांमध्ये सध्या ब्रिस्टलच्या मैदानावर एकमात्र कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ पिछाडीवर असला तरी भारताची युवा पदार्पणवीर शेफाली वर्मा चमकदार कामगिरी करते आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात जबरदस्त खेळी करतांना तिने ९६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसर्याही डावात तिने अर्धशतक झळकवले आहे. यासह तिने खास विक्रम देखील आपल्या नावे केला आहे.
शेफालीने रचला इतिहास
शेफाली वर्माने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र पदार्पणाच्या सामन्यातच तिने लक्ष वेधून घेतले. या सामन्याच्या पहिल्या डावात तिने ९६ धावांची आक्रमक खेळी केली. मात्र दुर्दैवाने तिचे पदार्पणातील शतक अवघ्या चार धावांनी हुकले. मात्र आपला फलंदाजीतील फॉर्म तिने दुसर्या डावात पण कायम ठेवला.
दुसर्या डावात देखील शेफालीने अर्धशतक झळकवले. १७ वर्षीय या युवा फलंदाजाने या अर्धशतकासह खास विक्रम आपल्या नावे केला. आपल्या पदार्पणाच्या कसोटीत दोन्ही डावात ५० पेक्षा अधिक धावा करणारी ती पहिली भारतीय आणि जगातील चौथी खेळाडू ठरली. यापूर्वी इंग्लंडची लेस्ली कुक, श्रीलंकेची वनीसा बोवेन आणि ऑस्ट्रेलियाची जेफ जॉन्सन यांनी हा पराक्रम केला होता.
Shafali Verma becomes the first India Women player to score 50+ in both innings on Test debut! 👏
What. A. Talent.https://t.co/M8MZFYicFn | #ENGvIND pic.twitter.com/67fbxSoEUQ
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 18, 2021
भारतीय संघ सामन्यात बॅकफूटवर
दरम्यान, शेफाली वर्माने दमदार कामगिरी केली असली तरी भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावातील ३९६ धावांना उत्तर देतांना भारतीय संघ बिनबाद १६७ अशा चांगल्या सुरुवाती नंतर देखील २३१ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडने भारताला फॉलो ऑन दिला. त्यानंतर फलंदाजी करतांना तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने १ बाद ८३ धावा केल्या होत्या. शेफाली वर्मा ५५ धावांवर तर दीप्ती शर्मा यावेळी १८ धावांवर नाबाद होती. या सामन्याचे अजून दोन दिवस बाकी असून भारतीय संघ अद्याप ८२ धावांनी पिछाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या-
वाचाल तर वाचाल! सामना सुरू होण्याआधी न्यूझीलंडच्या खेळाडूंचा फोटो व्हायरल
WTC Final 2021: पावसाचा खेळ सुरुच राहिल्याने पहिल्या दिवसाचा खेळ रद्द
WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ‘ही’ तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ