मुंबई । कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2020 च्या हंगामातील विजेता मिळाला आहे. सीपीएलच्या अंतिम सामन्यात शाहरुख खानच्या मालकीच्या ट्रिनबागो नाइट रायडर्सने प्रीती झिंटाच्या सेंट लुसिया झुक्सचा 8 गडी राखून पराभव केला.
सेंट लुसियाने विजेतेपदाच्या सामन्यात 154 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात त्रिनिबागोने 18.1 षटकांत 2 बाद 157 धावा केल्या. अशाप्रकारे ट्रिनबागोच्या संघाने चौथ्यांदा सीपीएलचे विजेतेपद मिळविले. ब्रायन लारा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.
शाहरुख खानने संघ सेलिब्रेशन करताना टीव्हीच्या समोर थांबून सेल्फी काढला आणि सोशल मीडियावर शेअर करत आपल्या संघाचे अभिनंदन केले आहे. कोविड -१९ च्या कारणास्तव तो संघाचे मनोबल वाढवण्यासाठी त्रिनिदादला जाऊ शकला नाही.
टीव्हीवर सामना पाहिला
शाहरुखने विजेतेपद जिंकल्यानंतर संघासोबत टीव्ही समोर थांबून सेल्फी काढला अन पोस्ट करत लिहिले की, “टीकेआर, आपण जिंकलो. मस्त.. आपण मला गौरवान्वित केले. चाहत्याशिवाय आनंद साजरा केला. खूप सारे प्रेम. लेंडल सिमन्स, ड्वेन ब्राव्हो आणि कायरन पोलार्ड आणि डॅरेन ब्राव्हो आपण सर्वांनी खूप चांगले काम केले. ब्रँडन मॅक्युलमला खूप सारे प्रेम .. आता आयपीएलमध्ये या.”