---Advertisement---

“ना ना म्हणत 10 हंगाम खेळेल”, धोनीच्या निवृत्तीबाबत केकेआरचा संघमालक शाहरुखचे मजेशीर विधान

Shahrukh Khan MS Dhoni
---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खानने (Shahrukh Khan) एमएस धोनीच्या आयपीएलमधील भविष्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान, बॉलीवूड सुपरस्टारला अभिनय कारकिर्दीतून निवृत्तीबद्दल विचारले असता त्याने मजेदार उत्तर दिले. शाहरुखने त्याच्या निवृत्तीचा संदर्भ धोनीच्या आयपीएलमधील निवृत्तीशी जोडत लक्षवेधी उत्तर दिले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नुकतेच आयफा पुरस्कार सोहळ्यात चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने शाहरुख खानला त्याच्या निवृत्तीबद्दल विचारले. यावर शाहरुखने मजेशीर उत्तर दिले. शाहरुख म्हणाला की, तो आणि धोनी एकाच प्रकारचे दिग्गज आहेत. शाहरुख म्हणाला की, धोनीने ना ना बोलता बोलता 10 आयपीएल हंगाम खेळले आहेत आणि तो पुढेही खेळत आहे.

शाहरुख खानने मजेशीर उत्तर दिले
शाहरुखने करण जोहरला सांगितले की, दिग्गजांची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांची खासियत ही आहे की त्यांना कधी थांबायचे, कधी निवृत्त व्हायचे हे माहित असते. महान सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, महान टेनिस स्टार रॉजर फेडररसारख्या दिग्गजांना निवृत्त कधी व्हायचे हे माहीत असते.

शाहरुख पुढे म्हणाला, पण खरं तर मी दुसऱ्या प्रकारचा लीजेंड आहे. धोनी आणि मी समान पद्धतीचे दिग्गज आहोत. धोनी नाही म्हणता म्हणता आयपीएलचे 10 हंगाम खेळेल.

आयपीए 2025 चे रिटेन्शन नियम जाहीर
उल्लेखनीय आहे की बीसीसीआयने आयपीएल 2025 साठी खेळाडूंच्या रिंटेशनचे नियम जाहीर केले आहेत. लिलावापूर्वी प्रत्येक संघाला जास्तीत जास्त सहा खेळाडू संघात कायम ठेवण्याची परवानगी असेल.

अनकॅप्ड खेळाडूंबाबतही एक नवा नियम बनवण्यात आला आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पाच वर्षांहून अधिक काळ निवृत्त झालेला कोणताही भारतीय खेळाडू ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून गणला जाईल. यामध्ये माजी कर्णधार एमएस धोनीचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, 14 महिन्यांनंतर मॅच विनर खेळाडूचे पुनरागमन
इशान किशनचे भारतीय संघातील पुनरागमन लांबणीवर, ‘या’ कारणामुळे मिळाले संकेत!
INDvsBAN : अभिषेक शर्मा अन् ‘या’ खेळाडूची सलामी जोडी ठरू शकते धोकादायक; माजी निवडकर्त्यांचे मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---