---Advertisement---

असे केले किंग खान शाहरुखने दिनेश कार्तिकचे कोलकाता संघात स्वागत

On: मंगळवार, मार्च 6, 2018 1:15 PM
---Advertisement---

कोलकाता | केकेआर संघाने अनेक दिग्गज संघात असताना दिनेश कार्तिकची 11व्या मोसमासाठी कर्णधार म्हणून निवड केली. राॅबीन उथप्पा आणि ख्रिस लीन सारखे खेळाडू संघात असतानाही कार्तिकला कर्णधार करण्यात आलं. 

बाॅलीवूडचा किंग खान अशी ओळख असणारा शाहरूख खान या निवडीबद्दल सकारात्मक आहे. 

2 वेळा संघाला आयपीएल विजेतेपद जिंकून देणाऱ्या दिल्लीकर गौतम गंभीरला संघात कायम न ठेवता केकेआर संघाने वेगळ्या नेतृत्वाबरोबर जाणे पसंत केले तर राॅबीन उथप्पाला उपकर्णधारपद देण्यात आले. 

शाहरूख खानने काल ट्विटरच्या माध्यमातून दिनेश कार्तिकला शुभेच्छा देताना काही अपेक्षाही मांडल्या. 

केकेआर संघाचे आजपर्यंत जे कर्णधार राहीले आहेत त्यांनी जस काम केल आहे तसचं तुझ्याकडून होईल असं शाहरूख आपल्या ट्विटमध्ये म्हणतो. 

 

 

 

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment