गुरुवारी (6 एप्रिल) चाहत्यांना एक रोमांचक आयपीएल सामना पाहायला मिळाला. आयपीएल 16 हंगामातील हा 9 वा सामना असून कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत झाली. केकेआरने तब्बल 81 धावांच्या अंतराने होम ग्राउंडवर विजय मिळवला. लाईव्ह सामन्यादरम्यान शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान देखील उपस्थिती होते. भारतीय संघाचा दिग्गज क्रिकेटपटू शार्दुल ठाकुर याचे सुहानावर चांगलाच प्रभाव पाडल्याचे विजयानंतर दिसले.
आरसीबीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या केकेआरची सुरुवात अपेक्षित पद्धतीने होऊ शकली नाही. सलामीवीर रहमन्नुल्ल्हा गुरबाझ याने अर्धशतक केले. पण त्यानंतर सलग तीन फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद झाले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या रिंकू सिंग याने 46 धावा ठोकल्या. पण सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शार्दुल ठाकुर वादळी फॉर्ममध्ये होता. शार्दुलने अवघ्या 29 चेंडूत 68 धावा कुटल्या आणि संघाची धावसंख्या 200 पार घेऊन गेला. या जबरदस्त खेळीसाठी शार्दुलचे सर्वत्र कौतुक होत आहे. केकेआरची मालकिन सुहाना खान () हिनेही शार्दुलचे तोंड भरून कौतुक केले.
सुहाना म्हणाली, “मला क्रिकेट पाहण्याची जास्त आवड नव्हती. पण ही खेळी पाहिल्यानंतर मला वाटले, हे किती अप्रतिम आहे. मी अशी फलंदाजी याआधी पाहिली नव्हती. शार्दुल तू चांगला खेळलास. मी या ऐतिहासिक सामन्याची आणि तुझ्या अप्रतिम खेळीची साक्षीदार असल्याचा मला आनंद आहे. तू कोट्यावधी लोकांना आपला चाहता बनवले आहे, ज्यापैकी मी एक आहे.”
दरम्यान, शार्दुलच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर केकेआरने 20 षटकात 7 बाद 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीचे फलंदाज 17.4 षटकात 123 धावा करून सर्वबाद झाले. केकेआरसाठी गोलंदाजी विभागात वरुण चक्रवर्ती याने 3.4 षटकात 15 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आयपीएल पदार्पण करणाऱ्या सुयश शर्मा याने 4 षटकांमध्ये 3 विकेट्स नावावर केल्या. (Shah Rukh Khan’s daughter Suhana Khan praised Shardul Thacker’s performance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लेट पण थेट! KKRच्या गोलंदाजीपुढे बेंगलोरचा खेळ खल्लास, 81 धावांनी साकारला पहिला दमदार विजय
घातक इंग्लिश गोलंदाजाची आयपीएलमधून माघार, आरसीबी पर्यायी खेळाडूच्या शोधात