सध्या पाकिस्तानमध्ये तिरंगी मालिा खेळली जात आहे. या तिरंगी मालिकेतील लीग टप्प्यातील शेवटचा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (Pakistan vs South Africa) संघात खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत धावफलकावर 350 धावा केल्या. या मालिकेत आफ्रिकन फलंदाज ‘मॅथ्यू ब्रिट्झके’ने वनडे पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने शानदार 150 धावा केल्या.
आता त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध 83 धावांची शानदार खेळीही केली होती, पण बुधवारी (12 फेब्रुवारी) झालेल्या सामन्यात ‘शाहीन शाह आफ्रिदी’सोबत (Shaheen Shah Afridi) झालेल्या त्याच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली.
It’s getting all heated out there! 🥵
Shaheen Afridi did not take kindly to Matthew Breetzke’s reaction, leading to an altercation in the middle! 🔥#TriNationSeriesOnFanCode pic.twitter.com/J2SutoEZQs
— FanCode (@FanCode) February 12, 2025
ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या 28व्या षटकातील आहे, ज्यामध्ये ब्रिट्झकेने एका चेंडूचा बचाव केला. चेंडू मारल्यानंतर त्याने बॅट वर केली, पण आफ्रिदीला त्याची ही कृती आवडली नाही. आफ्रिदी ब्रीट्झकेकडे काही पावले चालत गेला आणि त्याला रागाने काहीतरी म्हणाला. या सामन्यात ब्रीट्झकेने 84 चेंडूत 83 धावा करताना 10 चौकारांसह 1 षटकार मारला. दुसरीकडे, आफ्रिदीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 2 विकेट्स घेतल्या.
26 वर्षीय मॅथ्यू ब्रीट्झकेने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने फक्त एकच कसोटी डाव खेळला आहे, ज्यामध्ये तो शून्यावर बाद झाला होता. त्याने 10 टी20 सामन्यांमध्ये 151 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 2 सामन्यात 233 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs ENG; शतक झळकावताच शुबमन गिलने इतिहास घडवला, भारताचा नवा स्टार..!
ICC वनडे रँकिंग: गिल चमकला, विराटची मोठी घसरण, रोहितचेही नुकसान
38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा; टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला रौप्यपदक