क्रिकेटविश्वासाठी २०२१ वर्षा खास राहिले. मागच्या वर्षी अनेक महत्वाच्या मालिका आणि स्पर्धा खेळल्या गेल्या. मागच्या वर्षी टी२० विश्वचषक देखील खेळला गेला. प्रत्येक संघाने मागच्या संपूर्ण वर्षात चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तान संघाने या सर्व संघांपेक्षा वेगळी छाप पाडली. टी२० विश्वचषकात पाकिस्तानचा संघ उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला होता. याच पार्श्वभूमीवर मागच्या वर्षातील प्रदर्शनासाठी दिल्या जाणाऱ्या आयसीसी पुरस्कारांमध्ये पाकिस्तानचा दबदबा राहिला. पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफ्रिदी (shahin afridi) याला सोमवारी (२४ जानेवारी) आयसीसी प्लेअर ऑफ द ईयर (icc player of the year) निवडले गेले.
पाकिस्तान संघातील चार खेळाडूंनी मागच्या वर्षी केलेल्या अप्रतिम कामगिरीसाठी त्यांना आयसीसीकडून पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले आहे. सोमवारी आयसीसीने ट्वीटर खात्यावरून शाहीन अफ्रिदीला प्लेअर ऑफ द ईयर निवडल्याचे जाहीर केले गेले. शाहीन अफ्रिदीने मागच्या वर्षी एकूण ३६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. २०२१ मध्ये शाहीन अफ्रिदीने पाकिस्तान संघासाठी २२.२० च्या सरासरीने ७८ विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने सर्वश्रेष्ठ प्रदर्शनात ५१ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या.
शाहीन अफ्रिदीव्यतिरिक्त पाकिस्तान संघातील इतर तीन खेळाडूंना देखील आयसीसी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. यामध्ये कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि फातिमा सना या महिला क्रिकेटपटूचा समावेश आहे. पाकिस्तानच्या बाबर आझम (babar azam) याला वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर निवडले गेले आहे. बाबरने मागच्या वर्षी पाकिस्तान संघासाठी सहा एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये त्याने ६७.५० च्या सरासरीने ४०५ धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत त्याने संघासाठी सर्वाधिक २२८ धावा केल्या होत्या.
पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवान याने मागच्या वर्षी टी२० क्रिकेटमध्ये केलेल्या तुफानी फटकेबाजीसाठी त्याल आयसीसी टी२० प्लेअर ऑफ द ईयर निवडले गेले. रिझवानने मागच्या वर्षी २९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ७३.६६ च्या सरासरीने आणि १३४.८९ च्या स्ट्राइक रेटने १३२६ धावा केल्या.
पाकिस्तान महिला संघाची फातिमा सना मागच्या वर्षातील आयसीसी इमर्जिंग प्लेअर ऑफ द ईयर ठरली. २० वर्षीय फातिमा सनाने तिच्या अप्रतिम प्रदर्शनाने सर्वांनाच प्रभावित केले. तिने २३.९५ च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या आणि १६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६.५० च्या सरासरीने १६५ धावा केल्या. तिच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतील योगदानासाठी ती पाकिस्तानच्या एकदिवसीय आणि टी२० संघाची एक महत्वाची खेळाडू ठरली.
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! स्मृतीने उंचावली भारताची मान! ठरली २०२१ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू (mahasports.in)