---Advertisement---

अगग, लग्नाआधीच जावई प्रेम जगजाहीर! शाहिद-शाहीनचा ‘तो’ व्हिडिओ भन्नाट व्हायरल, लोक घेतायत मजा

On: सोमवार, मार्च 8, 2021 4:48 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी लवकरच विवाहीत जिवनाची पहिली पायरी चढणार आहे. अर्थातच त्याचा साखरपुडा होणार आहे. त्याची होणारी जिवनसंगिनी अजून कोण नसून ती पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची थोरली मुलगी अक्सा आफ्रिदी आहे. मात्र अद्याप त्यांच्या साखरपुड्याची नेमकी तारिख पुढे आलेली नाही. हे आनंदाचे वृत्त पुढे आल्यानंतर शाहिद आणि शाहीनच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

त्याचे झाले असे की, शनिवारी (०६ मार्च) शाहीनचे वडील अयाज खान यांनी आपल्या लेकाच्या लग्नाची माहिती जगजाहीर केली. पाकिस्तानी माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले, आम्ही शाहीनच्या लग्नासाठी शाहिदच्या घरी प्रस्ताव पाठवला होता, जो त्यांनी स्विकार केला आहे. ४१ वर्षीय शाहिदची मोठी मुलगी अक्सा आफ्रिदी हिच्यासोबत शाहीनचा साखरपुडा होणार आहे. मात्र अक्सा सध्या तिचे शिक्षण पूर्ण करत असल्याने येत्या २ वर्षात त्यांचा साखरपुडा होण्याची शक्यता आहे.

याबरोबरच पाकिस्तानी पत्रकार इहतिशम उल हक यानेही ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली होती. ‘दोन्ही कुटुंबांच्या परवानगीनंतर मी सर्वांना सांगू इच्छितो की, खरोखरच शाहीन आणि अक्सा यांचा साखरपुडा होणार आहे. दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नासाठी संमती दिली आहे. अक्साचे शिक्षण २ वर्षात पूर्ण होईल. यादरम्यान त्यांचा साखरपुडा केला जाऊ शकतो,’ असे त्याने ट्विटमध्ये लिहिले होते.

https://twitter.com/iihtishamm/status/1368237720452161536?s=20

 

शाहिद-शाहीनचा जुना व्हिडिओ व्हायरल

यानंतर नेटकऱ्यांनी शाहिद आणि शाहीनचा पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ पीएसएल २०१८ मधील आहे. यामध्ये शाहिद शाहीनच्या गोलंदाजी फलंदाजी करताना दिसत आहे. दरम्यान शाहीनच्या एका चेंडूवर शाहिदचा त्रिफळा उडतो. हे पाहून आनंदाने जल्लोष साजरा करायचा सोडून, शाहीन नाराज झाल्याचे दिसत आहे.

यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावत प्रतिक्रिया दिल्या आहेत. जावई आपल्या होणाऱ्या सासऱ्याची विकेट काढल्यामुळे हताश झाला असल्याचे, अनेकांनी म्हटले आहे. तर अनेकांनी या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या चित्रपटातील ‘दुल्हे राजा’ हे गाणे वाजवले आहे.

https://twitter.com/Yeh_tu_hoga/status/1368250039517216770?s=20

https://twitter.com/Zakr1a/status/1368575737750511616?s=20

https://twitter.com/AqsaMasood01/status/1368637366106267651?s=20

https://twitter.com/Ayesha_ZaYain2/status/1368634832985657344?s=20

https://twitter.com/zeezeezay/status/1368603383570006020?s=20

शाहीन आफ्रिदीची क्रिकेट कारकिर्द

डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या २० वर्षांचा असून तो पाकिस्तान संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने २२ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४५ विकेट्स चटाकवल्या आहेत. तर २१ टी२० सामन्यात २४ विकेट्स आणि १५ टी२० सामन्यात ४८ विकेट्सची कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---