---Advertisement---

३९ शतके ठोकणाऱ्या या फलंदाजाने पैशांसाठी सोडला देश; आफ्रिदीने केली होती जहरी टीका

On: मंगळवार, जुलै 14, 2020 4:29 PM
---Advertisement---

मुंबई । पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी हा नेहमीच वादग्रस्त विधान करुन चर्चेत राहतो. टीका करत असताना प्रसंगी तो मर्यादाही देखील ओलांडतो. 2015 साली त्याने माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. आफ्रिदीने, मोहम्मद युसूफला पैशांसाठी देश सोडणारा क्रिकेटर असल्याचे म्हटले होते. आफ्रिदीची ही टीका फॅन्सला पसंत पडली नव्हती.

एका सार्वजनिक कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीने मोहम्मद युसूफवर आगपाखड केली होती. तो म्हणाला, “मोहम्मद युसुफ खूप बडबड करतो. खेळाडूंना काहीही बोलत राहतो. तो माझ्यापेक्षाही मोठा क्रिकेटर असेल पण मी आता त्याला क्रिकेटर म्हणणार नाही. स्वतःची नव्हे, तर कमीत कमी समाजाची तरी इज्जत त्याने राखावी. शाळा आणि मशिदीमध्ये तो अल्लाविषयी बोलत असतो, पण बाहेर आल्यानंतर वेगळ्या पद्धतीने वागतो. त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात फरक आहे.”

“मोहम्मद युसूफ हा पाकिस्तान क्रिकेटच्या भल्यासाठी अनेक गोष्टी बोलत असतो. पण हाच माणूस पाकिस्तान सोडून पैशासाठी आयसीएल मध्ये गेला होता. मला पण आठ कोटी रुपयांची ऑफर आली होती. पण मी देशासाठी खेळण्याचा निर्णय घेतला होता,” असे आफ्रिदी म्हणाला.

मोहम्मद युसुफ पाकिस्तानकडून खेळताना 90 कसोटी सामन्यात 52 पेक्षा जास्त सरासरीने 7530 धावा केल्या आहेत. यात 24 शतकांचा समावेश आहे. याशिवाय युसूफने 288 वनडे सामन्यात 9720 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 15 शतकांची नोंद आहे. मोहम्मद युसूफच्या नावावर एकूण 39 शतकांची नोंद आहे. या आकड्या समोर आफ्रिदीचे आकडे जवळपास कुठेच दिसून येत नाही. तरीही पाकिस्तानच्या या मोठ्या खेळाडूंविषयी त्याने सार्वजनिक ठिकाणी परखड टीका केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---