भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) सामन्यात नेहमीच एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण पाहायला मिळते. मग तो कोणताही खेळ असो. एशिया कप (Asia Cup)2022च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान अ या एकाच गटात आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ रविवारी (28 ऑगस्ट) समोरासमोर आले. तो सामना भारताने 5 विकेट्सने जिंकला आहे. तर या सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये खेळीमेळीचे वातावरण दिसले. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवानच्या खांद्यावर हात पण ठेवला होता.
सध्या दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये तणावाचे हावभाव दिसले नाही. मात्र दोन्ही संघातील प्रत्येक खेळाडू असा नव्हता. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात अनेकवेळा मैदानात वातावरण तापलेले दिसले आहे.
गंभीर आणि आफ्रिदी यांच्यात 2007च्या कानपूर वनडे सामन्यात शाब्दिक वाद झाला होता. यानंतर त्यांचा हा वाद चांगलाच चर्चेत आला होता. सामान्यत एखादा खेळाडू नेहमी म्हणतो की, मैदानावर झालेला वाद परतल्यावर विसरला जातो. मात्र गंभीर आणि आफ्रिदी यांच्यात अशी स्थिती नाही. मागील काही वर्षापासून हे दोन्ही खेळाडू सोशल मीडियावर एकमेकांबाबत विधाने करतच असतात. मग ते क्रिकेटविषयी असो वा राजकारणाविषयी. रविवारीही असाच एक किस्सा घडला आहे. आफ्रिदीने पाकिस्तानच्या एका टिव्ही चॅनलच्या कार्यक्रमात भाग घेतला होता. यामध्ये त्याने गंभीरवर एक टिप्पणीही केली होती. यावरच भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याची प्रतिक्रिया पाहून काही भारतीय नाराज झाले.
आफ्रिदीने त्या कार्यक्रमामध्ये गंभीरला भारतीय खेळाडू पसंत करत नव्हते, असे विधान केले. या चर्चासत्रात हरभजननेही भाग घेतला होता. आफ्रिदीने भारतीय खेळाडूंविषयी म्हटले, “असे नाही की माझा कोणत्याच भारतीय खेळाडूसोबत वाद झाला नाही. सोशल मीडियावर कधी-कधी गौतम गंभीरशी शाब्दिक वाद होतो. मला वाटते की गौतम हे एक असे पात्र आहे ज्याला भारतीय संघात कोणच पसंत करत नाही.”
आफ्रिदीच्या या विधानावर हरभजन हसताना दिसला आहे. तर सोशल मीडियावर आफ्रिदीच्या विधानावर आणि हरभजनच्या हावभावावर चाहत्यांनी त्यांना धारेवर धरले आहे. चाहत्यांनी ट्वीटरवर हरभजनच्या हसण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Afridi saying such things is understandable but sad to see @vikrantgupta73 sir and Harbhajan Singh @harbhajan_singh sir laughing instead of countering
— Bihari Boy (@beyondthenew) August 28, 2022
Shameless @harbhajan_singh is laughing #PKMKB https://t.co/C5MHg7JOux
— Mahesh Aggarwal🇮🇳 (@imaheshspeaks) August 29, 2022
https://twitter.com/IamNishant_30/status/1564170652944281601?s=20&t=zERM1aErpCZJP0EeG4JPJg
पाकिस्तान विरुद्ध भारताने विजयासाठी 148 धावांचा पाठलाग केला. हा सामना भारताने 2 चेंडू शिल्लक राखत जिंकला. यावेळी हार्दिक पंड्या याने गोलंदाजी 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि फलंदाजीत नाबाद 33 धावा केल्या. त्याने शेवटच्या षटकात षटकार मारत भारताला थरारक सामन्यात विजय मिळवून दिला. यावेळी तो सामनावीराचा मानकरी ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अल्टिमेट खो-खो: कश्यप व नरसय्या यांच्या कामगिरीमुळे चेन्नई क्विकगन्स प्ले ऑफमध्ये; मुंबई खिलाडीज बाहेर
चांगल्या खेळीनंतरही भारतीय दिग्गजाने केली विराटवर आगपाखड; वापरले हे कठोर शब्द
INDvsPAK: सामन्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजाला विराट कोहलीकडून मिळाले ‘हे’ खास गिफ्ट