---Advertisement---

पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीला राग अनावर, संघाला कानपिचक्या देत म्हणाला…

On: सोमवार, ऑगस्ट 26, 2024 8:26 AM
Shahid afridi
---Advertisement---

बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी चांगलाच संतापला आहे. त्यानं संघाच्या खराब कामगिरीसोबतच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रावळपिंडी येथील पराभवानंतर आफ्रिदीनं शान मसूदच्या नेतृत्वाखालील संघाकडे घरच्या परिस्थितीची जाण नसल्याचा आरोप केला.

शाहिद आफ्रिदीनं त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर लिहिलं, “10 विकेट्सच्या पराभवानंतर अशा प्रकारची खेळपट्टी तयार करणं, चार वेगवान गोलंदाजांची निवड करणं आणि मुख्य फिरकीपटूला वगळणं यांसारख्या निर्णयावर गंभीर प्रश्न निर्माण होतात. माझ्या मते हे घरच्या परिस्थितीची जाण नसल्याचं दर्शवतं. बांगलादेशचा संघ संपूर्ण कसोटीत ज्या प्रकारे खेळला, त्याचं श्रेय त्यांना जातं.”

 

मालिकेतील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, रावळपिंडी येथे झालेली ही कसोटी ओल्या आउटफिल्डमुळे विलंबानं सुरू झाली होती. पहिल्या दिवशी केवळ 41 षटकांचा खेळ झाला. पाहुण्या संघानं फटाफट चार विकेट्स घेत दमदार सुरुवात केली. यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा डाव सांभाळला. या दोघांनीही शतकं झळकावली. रिझवाननं त्याच्या मॅरेथॉन खेळीत नाबाद 171 धावा केल्या. वेळ वाचवण्यासाठी पाकिस्ताननं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच 448/6 धावांवर डाव घोषित केला.

येथे शाहिद आफ्रिदीचा मुद्दा योग्य वाटतो. कारण पाकिस्ताननं जर खेळपट्टीचं योग्य आकलन केलं असतं, तर त्यांनी पहिल्या डावात 500 किंवा 550 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा होता. पाकिस्तानच्या 448 धावांना प्रत्युत्तर देताना बांगलादेशनं सर्वांना चकित केलं आणि 565 धावा केल्या. डाव घोषित करण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या पराभवाचा पाया रचला गेला होता. दुसऱ्या डावात पाकिस्तानचा संघ 146 धावांवर ऑलआऊट झाला आणि बांगलादेशनं एकही गडी न गमावता 30 धावा करत सामना सहज जिंकला.

हेही वाचा – 

“जज करू नका…”, घटस्फोटानंतर नताशा स्टॅनकोविकनं मुलासोबत शेअर केला व्हिडिओ
बांगलादेशनं दिला पाकिस्तानला झटका, WTCच्या गुणतालिकेत घेतली झेप
बांगलादेशनं इतिहास रचला! पाकिस्तानची घरच्या मैदानावर नाचक्की

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---