Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“बाबर अजून विराटच्या बरोबरीचा नाही”, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगितली कमजोरी

February 28, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Babar-Azam-Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली व पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांची सातत्याने तुलना होत असते. विराट बाबरपेक्षा अधिक अनुभवी असला तरी, बाबरने त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. याच विराट व बाबर यांच्या तुलनेविषयी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने मोठे वक्तव्य केले आहे.

सध्या विराट व बाबर यांना जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानले जाते. सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक धावा व सर्वाधिक शतके विराटच्या नावे आहेत. तर, बाबरने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करत 2022 वर्षाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याचा मान मिळवला. असे असले तरी शाहिद आफ्रिदी बाबर याला विराट कोहलीपेक्षा कमी मानतो. एका मुलाखतीत बोलताना आफ्रिदी म्हणाला,

“बाबर सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये आहे यात कोणतेही दुमत नाही. मात्र, असे असले तरी त्याला विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स यांची बरोबरी करण्यासाठी एक गोष्ट रोखत आहे. ती गोष्ट म्हणजे फिनिशिंग. बाबर एका बाजूने उभा राहून किल्ला लढवू शकतो. मात्र, विराट व एबी यांच्याप्रमाणे तो फिनिशिंग करू शकत नाही. त्यामुळेच तो महानतेपासून दूर आहे.”

विराटच्या एकूण कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 106 कसोटी, 271 वनडे व 115 टी20 सामने खेळताना अनुक्रमे 8195, 12809 व 4008 धावा काढल्या आहेत. यात तब्बल 73 शतकांचा समावेश आहे. दुसरीकडे बाबरने आपल्या सात वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 47 कसोटी, 95 वनडे व 99 टी20 सामने खेळलेत. यामध्ये त्याच्या नावे अनुक्रमे 3696, 4813 व 3355 धावा जमा आहेत. तर त्याची एकूण आंतरराष्ट्रीय शतकांची संख्या केवळ 28 इतकी आहे. त्यामुळे सध्या आकडेवारीचा विचार केल्यास विराटच बाबरपेक्षा सरस असल्याचे दिसून येते.   ‌‌‌

(Shahid Afridi Said Babar Azam Have No Quality Of Match Finishing Like Virat Kohli And AB de Villiers)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीत विराट करणार खास क्लबमध्ये एन्ट्री! यापूर्वी भारताकडून फक्त द्रविडच मानकरी 
बुमराहचे पुनरागमन सप्टेंबरपर्यंत लांबणार! कारकीर्दीविषयी आता बीसीसीआय घेणार कठोर निर्णय 


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

इंदोर कसोटीसाठी टीम इंडियात होणार बदल? प्रदीर्घ काळानंतर 'या' दोघांना मिळणार संधी

Phhoto Courtesy: File Photo

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलची विजयी सलामी

Rohit-Sharma-And-KL-Rahul

नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, केएल राहुल आणि 'हा' प्रमुख खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143