मुंबई । पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतो. भारताचे राजकीय धोरण आणि क्रिकेटपटूंवर तो नेहमीच शाब्दिक तलवार चालवत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. तसेच माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात नेहमी शाब्दिक युद्ध सुरू असते.
पाकिस्तानच्या जनतेमध्ये जाऊन एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत आहे. तसेच राजकारणात प्रवेश करण्यासाठी हे सारं करत असल्याचा आरोपही आता त्याच्यावर होत आहे. काही दिवसांपूर्वी आफ्रिदीने पाकव्याप्त काश्मिरमध्ये जाऊन तेथील जनतेला मदत केली होती. याच दरम्यान त्याचा एक सोशल मीडियाला व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात त्याचा खरा चेहरा जगासमोर आला आहे.
कोरोनाच्या सावटात शाहिद आफ्रिदी एका कार्यक्रमात भाषण करत असताना एक गरीब माणूस त्याच्याजवळ फोटो काढण्यासाठी आला. त्यावेळी शाहिद आफ्रिदीने सोशल डिस्टिंग नियमांचे उल्लंघन होत असल्याने मध्येच भाषण थांबून तो त्याच्यावर चिडलेला दिसला.
https://www.instagram.com/p/CBDVdyeJZW-/?utm_source=ig_embed
त्यानंतर त्या व्यक्तीला तेथून बाहेर काढण्यात आले. शाहिद आफ्रिदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर एका युजरने शाहीद आफ्रिदीला खूप घमंड असल्याची प्रतिक्रिया दिली.