---Advertisement---

विसरभोळा आफ्रिदी ! ‘हा’ महत्त्वाचा नियम विसरला अन् आयसीसीलाच केले टार्गेट

---Advertisement---

कोरोना महामारीमुळे जगभरातील क्रिकेट स्पर्धा अनेक बंधनांसह सुरू आहेत. काही ठिकाणी अजूनही प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्यास बंदी आहे तर काही ठिकाणी मैदान क्षमतेचा निम्म्या प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जात आहे. प्रत्यक्ष मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंवर देखील काही बंधने लादली गेली आहेत. काहीवेळा या नियमांचा खेळाडूंना विसर पडतो त्यामुळे ते खेळाडू चर्चेत येतात. पाकिस्तानचा माजी कर्णधार व सध्या पीएसएलमध्ये खेळणारा शाहिद आफ्रिदीदेखील अशाच एका घटनेमुळे सध्या चर्चेत आहे.

आफ्रिदीला पडला विसर
पाकिस्तान सुपर लीगच्या सहाव्या सामन्यात पेशावर झाल्मी व मुलतान सुलतान्स हे संघ आमनेसामने आले होते. त्यावेळी गोलंदाजीसाठी आलेल्या शाहिद आफ्रिदीने आपली टोपी पंचांकडे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचांनी ही टोपी घेण्यास नकार दिला.
कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात पंच खेळाडूंकडून कोणतीही वस्तू घेत नाहीत. नेमका याच गोष्टीचा विसर आफ्रिदीला पडला.

आफ्रिदीने केले ट्विट

या घटनेनंतर आफ्रिदीने आयसीसीला या घटनेविषयी विचारताना ट्विट केले, ‘प्रिय आयसीसी, तुम्ही सांगू शकता का पंचांना खेळाडूंची टोपी घेण्यास का परवानगी नाही? तेसुद्धा खेळाडू आणि इतर व्यवस्थापन ज्या बायो-बबलमध्ये राहते त्याच बायो-बबलमध्ये असतात. तसेच, सामन्यानंतर एकमेकांशी हस्तांदोलन देखील केले जाते.’

त्याच्या ट्विटवर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी त्यावर मजेदार मीम्सदेखील बनवलेले दिसून येतात.

मुलतान संघाचा भाग आहे आफ्रिदी
पुढील महिन्यात ४६ वर्षाचा होणारा आफ्रिदी पाकिस्तान सुपर लीगच्या सहाव्या हंगामात मुलतान सुलतान्स संघाचा सदस्य आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आफ्रिदी विविध व्यावसायिक टी२० लीगमध्ये खेळताना दिसून येतो. पीएसएलसोबतच लंका प्रिमीयर लीगमध्ये गॅले ग्लॅडीएटर्स तर अबुधाबी टी१० लीगमध्ये कलंदर्स संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘आम्ही आगामी आयपीएल जिंकण्यासाठी आतुर आहोत’, या कर्णधाराने फुंकले रणशिंग

चौथ्या सामन्यात होणार धावांची लयलूट? खुद्द बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खेळपट्टीबद्दल खुलासा

शिखर फॉर्ममध्ये आला रे !! विजय हजारे ट्रॉफीत तुफानी दीडशतक, एकट्याच्या बळावर पाजले महाराष्ट्राला पाणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---